आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना अडीच लाख रुपये

पुणे – जातीव्यवस्थेच्या विरोधात समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला दोन लाख पन्नास हजार रुपये देण्यात येतील, अशी घोषणा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केली. तसेच येत्या काळात आंतरजातीय विवाहांना विशेष प्रोत्साहनाच्या योजना, शासकीय लाभ, त्यांच्या अपत्यांना काही सवलती अशा बाबींचा समावेश करण्याचा मानस असून, यासंबंधीच्या कायद्याचा मसुदाही तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सावित्रीच्या लेकींचा सामाजिक न्यायमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी सामाजिक न्यायमंत्री बडोले म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातून जातीव्यवस्था तोडण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे आंतरजातीय विवाह हा सांगितला. मात्र, त्या प्रमाणात आंतरजातीय होताना दिसत नाहीत. समाजातील अंधःश्रद्धा, जातीयवाद, सरंजामी रुढी-परंपरा, जातपंचायतीच्या नावाची बंधने समाजातून नष्ट करण्यासाठी केवळ आंतरजातीय विवाह हाच पर्याय आहे. त्यामुळे आम्ही आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी अडीच लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला. यातील पहिला सामुदायिक आंतरजातीय विवाह सोहळा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येईल.

दरम्यान, आंतरजातीय कायद्यात आम्ही बदल करणार आहोत. आंतरजातीय विवाह केल्यानंतरच्या घटनांचा मागोवा घेतला, तर ऑनर किलिंगसारख्या घटनांपासून ते त्यांच्या अपत्यांना कायदेशीर संरक्षण, पोलीस मदत अशा बाबींचा समावेश या कायद्यात करणार असल्याचे बडोले यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)