अ.भा. मराठी साहित्य संमेलनात लोकराज्य स्टॉलचे उद्घाटन

यवतमाळ: यवतमाळ येथे आजपासून ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरूवात झाली. यावेळी ग्रंथप्रदर्शनात माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने लोकराज्य अंकांचा स्टॉल लावण्यात आला. या स्टॉलचे उद्घाटन पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्यासह माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक (माहिती) सुरेश वांदिले, अमरावती विभागाचे उपसंचालक राधाकृष्ण मुळी, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, सहायक संचालक गजानन कोटुरवार, मंगेश वरकड आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी, ध्वजारोहण, ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर हा कार्यक्रम झाला. लोकराज्य स्टॉलवर लोकराज्यच्या विविध विशेषांकासह महामानव, महात्मा गांधी आणि महाराष्ट्र, महाराष्ट्र वार्षिकी, मॅग्नेफिशियंट महाराष्ट्र आदींचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यावेळी पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह इतर मान्यवरांनी लोकराज्यच्या अंकांची तसेच इतर प्रकाशनांची पाहणी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)