अ.भा. मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी प्रेमानंद गज्वी

मुंबई – 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी यांची निवड करण्यात आली आहे. हा निर्णय अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. 98व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार ह्यांच्याकडून ते पदभार स्वीकारणार आहेत.

नाट्य संमेलनाचे ठिकाण लवकरच जाहीर होणार आहे. नागपूर, लातूर , पिंपरी चिंचवड या ठिकाणांची नावे स्पर्धेत आहेत. नाट्य संमेलन समिती या ठिकाणांचा दौरा करून संमेलनाचे अंतिम ठिकाण लवकरच ठरवणार आहे. श्रीनिवास भणगे, अशोक समेळ, सुनील साकोळकर अशी नावे स्पर्धेत होती. मात्र प्रेमानंद गज्वी यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

-Ads-

प्रेमानंद गज्वी हे मराठी कवी, लेखक आणि नाटककार आहेत. त्यांची लेखनशैली ही सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून समाजातील विदारक सत्य प्रभावीपणे मांडणारी शैली आहे. प्रेमानंद गज्वी यांनी किरवंत, देवनवरी सारखी नाटके लिहून समाजातील दुर्लक्षित विस्थापितांची बाजू मांडली. तर गांधी-आंबेडकर नाटकातून त्यांनी दोन महापुरुषांचा संघर्ष रेखाटला आहे. तर “हवे पंख नवे’ हा आंबेडकरांवर त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे.

एकतारी हा कविता संग्रह, लागण आणि ढीवर डोंगा हे कथासंग्रह, जागर ही कादंबरी तसेच बोधी कला संस्कृती आणि सगुण आणि निर्गुण हे वैचारिक ग्रंथ प्रकाशित आहेत. मामा वरेकर, अनंत काणेकर, आचार्य अत्रे, गो.ब देवल, किर्लोस्कर दया पवार आणि वि. वा. शिरवाडकर पुरस्काराने त्यांच्या सन्मान झाला असून त्यांना चार वेळा राज्य वाडःमय पुरस्कार मिळाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)