अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेली लक्ष्मी बनली दागिन्यांची ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडर

नवी दिल्ली : दागिने बनवणाऱ्या एका ख्यातनाम कंपनीने काढलेल्या प्रॉमिस बँन्ड या मनगटी विशेष बांगडीसाठी अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या व आता समाजसेवेला वाहून घेतलेल्या लक्ष्मी अग्रवाल-सा यांची निवड केली आहे. आपण नेहमी दुसऱ्यांना प्रॉमिस करत असतो मात्र आपण आपल्यासोबत प्रॉमिस क्वचितच करतो. प्रॉमिस बँन्डच्या माध्यमातून स्त्रियांनी स्वत:ला काही प्रॉमिसेस द्यावीत व ती पाळावीत असा आशय यातून अभिप्रेत असल्याचे लक्ष्मी यांनी म्हटले.
प्रॉमिस बँन्ड ही एक मनगटी बेल्ट किंवा बांगडी आहे. तीत कागदाची एक लहानशी घडी ठेवता येईल अशी सोय करण्यात आली आहे. या कागदावर आपण स्वत:ला एक प्रॉमिस लिहून तो कागद या बांगडीत ठेवायचा आहे. जेणेकरून त्या प्रॉमिसची सतत आठवण आपल्याला राहील व त्यानुसार आपण वाटचाल करू शकू, असा त्यामागचा हेतू लक्ष्मी यांनी स्पष्ट केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)