अ‍ॅसिड पीडितांना केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये आरक्षण

नवी दिल्ली : अ‍ॅसिड हल्ल्याने बाधित झालेल्या व्यक्तींना केंद्र सरकारच्या नोक-यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच बरोबरआत्मकेंद्रीपणा (आॅटिझम), मनोरुग्ण, बौद्धिक दुर्बलता यांचाही यात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, या निर्णयाचे अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. ‘अ’,‘ब’ आणि ‘क’ श्रेणीतील थेट भरतीच्या पदांपैकी चार टक्के जागा विवक्षित प्रमाणात अपंगत्व (बेंचमार्क डिसेबिलिटी)असलेल्या दिव्यांगांसाठी राखून ठेवल्या जाणार आहेत. ठराविक प्रकारच्या ४० टक्के किंवा त्याहून अधिक अपंगत्वास ‘बेंचमार्क डिसेबिलिटी’ म्हटले जाते.
केंद्र सरकारच्या सर्व खात्यांमध्ये अंध व अधूदृष्टी, कर्णबधीर, सेलेब्रल पाल्सीसह अवयव व्यंगता असलेले, स्नायूंचा शक्तीपात झालेले, खुजेपणाने उंची खुंटलेले आणि अ‍ॅसिडहल्ल्याने बाधीत झालेले अशा लोकांसाठी प्रत्येकी एक टक्का जागा राखून ठेवण्यात येणार आहेत. तसेच आॅटिझम, बौद्धिक दुर्बलता, शिक्षणात मंद असलेले व मनोरुग्ण यांच्यासाठीही हे एक टक्का आरक्षण लागू असेल. याआधी सन २००५ मध्ये काढलेल्या परिपत्रकानुसार दिव्यांगांसाठी तीन टक्के आरक्षण होते. २०१६ साली नवा दिव्यांग हक्क कायदा संमत झाल्यानंतर हे आरक्षण एक टक्क्याने वाढवण्यात आले आहे. दिव्यांगासाठी असलेल्या राखीव जागांवर फक्त याच प्रवर्गा तील व्यक्ती नेमल्या जाव्यात आणि त्या जागा रिकाम्या असतील तर त्यावर अनुसुचित जाती व जमातींच्या व्यक्तींची नेमणूक न करण्याची तरतूदही नव्या नियमांमध्ये करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)