अॅमी जॅक्‍सनचा अब्जाधीश बॉयफ्रेंडबरोबर साखरपुडा

‘2.0’, ची अभिनेत्री अॅमी जॅक्‍सनने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक खुशखबर चाहत्यांना दिली आहे. प्रियकर जॉर्ज पानायिटूसोबत तिने साखरपुडा केला आहे, ही ती खुशखबर आहे.

जॉर्ज ब्रिटिश प्रॉपर्टी डेव्हलपर अँड्रस पानायिटूचा मुलगा आहे. त्याचबरोबर हिल्टॉन, डबल ट्री, पार्क प्लाझा यासारखी अनेक आलिशान हॉटेल्स जॉर्जच्या मालकीची आहेत. जॉर्जला एक भाऊ आणि तीन सावत्र बहिणी आहेत. अॅबिलीटी ग्रुपचा तो संस्थापक असून वयाच्या 16 वर्षी तो या ग्रुपमध्ये सहभागी झाला होता. ज़ॉर्जच्या वडिलांची संपत्ती ही 400 मिलिअन पाऊंड असल्याचे म्हटले जात आहे. जॉर्जकडे अनेक आलिशान आणि जगातल्या सर्वात महागड्या गाड्या देखील आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अॅमीला डेट करण्याआधी जॉर्जचे नाव अनेक महिलांसोबत जोडले गेले आहे. पोलिसांना गंभीर मारहाण केल्याप्रकरणी जॉर्ज 6 महिने तुरूंगातही होता. अॅमी अनेकदा जॉर्जसोबत आपले फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करते. सध्या अॅमी जॉर्जसोबत दक्षिण आफ्रिकेत सुट्ट्या एन्जॉय करत आहे.

अॅमीने “मदरसपट्टीनम’ या तामिळ सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते तर 2012 साली रिलीज झालेल्या ‘एक दिवाना था’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. मूळ ब्रिटिश वंशाच्या अॅमी जॅक्‍सनने आतापर्यंत ‘सिंग इज ब्लिंग’ आणि ‘आय’ अशा सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. याशिवाय अलीकडेच तिच्या कन्नड सिनेमातील पदार्पणाचीही बातमी आली होती. “द व्हिलन’ हा कन्नड सिनेमा गेल्याच महिन्यात रिलीज झाला. मात्र या सिनेमाच्या कोणत्याच प्रमोशनमध्ये ती सहभागी झाली नव्हती. निर्मात्यांबरोबर काही मतभेदांमुळे ती प्रमोशनमध्ये अनुपस्थित होती, असे समजते आहे. काहीही असले तरी अॅमीला भारतीय सिनेमामध्ये अधिक रस असल्याचे आता स्पष्ट होते आहे. भारतातील सिनेमातील हिरोमध्ये मात्र तिला रस नाही. त्यासाठीच तिने ब्रिटिश हिरो निवडला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)