अॅफोर्डेबल हाऊसिंगमुळे संजीवनी (भाग-२)

नोटाबंदी, जीएसटी आणि रेरामुळे देशातील एकूणच बांधकाम क्षेत्रावर दीर्घकाळ नकारात्मक परिणाम झाला. त्यामुळे तयार घरांची विशेषत: तयार मोठ्या घरांची विक्री थंडावली. त्यात विकासकांचा बराच पैसा अडकला. मात्र, दरम्यानच्या काळात कमी किमतीच्या परवडणाऱ्या घरांना सरकारने बरीच चालना दिल्यामुळे अॅफोर्डेबल घरांची विक्री आता वाढताना दिसत आहे. त्यामुळे मंदीच्या गाळात अडकलेल्या रिअॅल्टीला चांगला आधार मिळू लागला आहे.

अॅफोर्डेबल हाऊसिंगमुळे संजीवनी (भाग-१)

अलीकडच्या काळात बिगर बॅंकिंग आर्थिक कंपन्या (एनबीएफसी) या रिअल्टी उद्योगासाठी महत्त्वाचा आर्थिक स्रोत होती. मात्र, इन्फ्रास्ट्रक्‍चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएलअँडएफएस) च्या डिफॉल्टनंतर हा स्रोत संपल्यागत जमा झाला. रिअॅल्टी रिसर्च फर्म प्रॉपइक्विटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर जसूजा म्हणतात की, एनबीएफसीमध्ये रोख रकमेच्या अभावामुळे बिल्डरसाठी विक्री न झालेल्या घरांची देखभाल करणे कठीण झाले आहे. त्यामुळेच काही विकासक कर्ज देणाऱ्या कंपन्यांकडे व्याज न भरल्याने डिफॉल्ट झाले आहेत. गेल्या तीन वर्षात उद्योगाची शुद्ध विक्री ही 3.2 टक्के वार्षिक चक्रवाढीच्या दराने घटली आहे. तर न विकलेल्या घराची मालमत्ता वार्षिक 8.2 टक्‍क्‍याने वाढली आहे.

विश्‍लेषणात समाविष्ट केलेल्या नमुना कंपन्यांच्या आर्थिक वर्ष 2019 च्या पहिल्या सहामाहीत संयुक्‍त शुद्ध विक्री 42,598 कोटी रुपये राहिली आहे ती आर्थिक वर्ष 2016 दरम्यान सुमारे 47 हजार कोटी रुपये होती. सप्टेंबर 2018 च्या शेवटी डीएलएलकडे सर्वात अधिक 23,815 कोटी रुपयांची मालमत्ता होती. ती सुमारे 39 महिन्यांच्या विक्रीच्या बरोबरी इतकी होती. त्यानंतर एचडीआयएल 14 हजार 560 कोटी, प्रेस्टिज इस्टेट 12 हजार 795 कोटी रुपये, इंडियाबुल्स रिअल इस्टेट 10 हजार 470 कोटी रुपये, ओमेक्‍सकडे 8 हजार 48 कोटी हजार रुपयांची न विकलेली मालमत्ता पडून होती. हे विश्‍लेषण 27 रिअॅल्टी इस्टेट डेव्हलपर कंपनीच्या आर्थिक लेखाजोखांवर आधारित आहे. या कंपन्या बीएसई 500 किंवा बीएसई मिडकॅप किंवा बीएसई स्मॉलकॅप इंडेक्‍सचा भाग आहेत. यात डीएलएफ, गोदरेज प्रॉपर्टीज, प्रेस्टीज इस्टेट, ओबेरॉय रिअॅल्टी, एचडीआयएल, इंडियाबुल्स रिअल इस्टेट, शोभा, ओमेक्‍स, कोलते पाटील डेव्हलपर्स आदींचा समावेश आहे.

– कमलेश गिरी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)