अॅप्स तुमच्या ‘वेल-बीइंग’साठी…!

आजची लाईफस्टाइल ही अत्यंत ‘बिझी’ झाली आहे. वाढत्या कामाच्या व्यापामुळे आजच्या जनरेशनला स्वतःकडेच लक्ष द्यायला वेळ राहिलेला नाही. अशा या धकाधकीच्या जीवनामध्ये व्यायाम, मेडिटेशन अशा आत्मशांतीसाठी महत्वाच्या असणाऱ्या गोष्टींकडे सहज दुर्लक्ष होऊन जाते आणि परिणामी कालांतराने स्ट्रेस, चिडचिड, भीती, झोप न लागणे असे आजार बळावू लागतात. या सर्व धोक्‍यांमधून जर तुम्हाला स्वतःला दूर ठेवायचे असेल तर तुमचा स्मार्टफोनच तुमच्यासाठी तारणहर्ता ठरणार आहे. यावर्षी गुगल-प्ले स्टोअरद्वारे ‘वेल-बीइंग’ या प्रकारातील अॅप्सना अवॉर्ड जाहीर करण्यात आले असून पाहुयात तुमच्या वेल-बीइंगसाठी कोणते ऍप्स सही आहेत.

सिम्पल हॅबिट मेडिटेशन : गुगल-प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध असलेले हे अॅप खासकरून ‘बिझी’ लोकांसाठीच बनविले गेले आहे. या अॅपचा वापर करून आपण केवळ काही मिनिटांमध्ये स्ट्रेसपासून मुक्ती मिळवू शकतो असा दावा या अॅपच्या डेव्हलपर्स कडून करण्यात आला आहे. या अॅपमध्ये हुन अधिक परिस्थितींमध्ये कोणत्या प्रकारचे मेडिटेशन करावे आणि ते कसे करावे याचा संपूर्ण लेखाजोखा देण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फॅब्युलस : मोटिव्हेट मी! : या अॅप्लीकेशनमध्ये रिसर्चद्वारा प्रमाणित पद्धतींचा अवलंब करून तुमचं डेली रुटीन अधिकाधिक हेल्दी बनवता येईल असा दावा या अॅपच्या डेव्हलपर्सकडून करण्यात आला आहे. या अॅपद्वारे तुम्हाला डेली फॉलो करता येतील अशी चॅलेंजेस दिली जातात. उदाहरणार्थ ‘रोज उठल्यानंतर एक ग्लास पिणे’ हे चॅलेंज अॅपद्वारे देण्यात आल्यास ते आपल्याला दररोज पूर्ण करावे लागते. तसेच या अॅपच्या माध्यमातून तुम्हाला सदैव मोटिव्हेटेड ठेवण्यासाठी चांगले विचारदेखील पाठविले जातात.

हेडस्पेस : मेडिटेशन अँड माइंडफूलनेस : या अॅपचा वापर आपण इंटरनेट कनेक्‍शन नसताना देखील करू शकतो. या अॅऍपमध्ये बेसिक मेडिटेशन कोर्स फ्री देण्यात आला असून प्रोफेशनल मेडिटेशनसाठी मात्र अॅपचे सबस्क्रिप्शन विकत घ्यावे लागणार आहे. या अॅपचा इंटरफेस देखील अत्यंत सोपा असल्याने वापरण्यास हलका वाटतो.

– प्रशांत शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)