अॅक्शनला  सस्पेन्सचा तडका…

चित्रपट – बागी २


निर्मिती – साजिद नाडीयाडवाला


दिग्दर्शक – अमजद खान


कलाकार – टायगर श्रॉफ, दिशा पाटनी, प्रतिक बब्बर, मनोज वाजपेयी, रणदीप हुडा, दीपक डोबरियाल


रेटिंग – 2.5

अमजद खान दिग्दर्शित ‘बागी 2’ हा चित्रपट 2016 मध्ये आलेल्या ‘बागी’चा हा सिक्वेल आहे. यामध्ये अॅक्शन, थ्रिलर, रोमान्स आणि सस्पेन्सचा तडका आहे. बागीमध्ये टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर ही जोडी पडद्यावर झळकली होती. तर ‘बागी 2’मध्ये टायगर आणि अभिनेत्री दिशा पाटनी ही जोडी आहे.

‘बागी २’ च्या कथेबद्दल सांगायचे तर ही  रॉनी (टायगर श्रॉफ) आणि नेहा (दिशा पाटनी) यांची लव्हस्टोरी आहे. या दोघांची भेट कॉलेजमध्ये होते. मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात होते. काही दिवसांनी नेहा आणि रॉनी लग्नाचा निर्णय घेतात. पण लग्नापूर्वीच नेहासोबत एक घटना घडले. दरम्यान काही वर्षांचा काळ जातो, नेहा एका मुलीचा शोध घेण्याची जबाबदारी रॉनीवर सोपवते. पण हा शोध घेत असताना रॉनीच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात, की ज्यामुळे त्याचे आयुष्यच बदलून जाते. नेमके रॉनी आणि नेहा यांच्यासोबत काय घडते?, रॉनी त्या मुलीचा शोध घेण्यात यशस्वी होतो का? हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट बघायला हवा.

अहमद खान दिग्दर्शित  बागी-2 हा ‘क्षणम’ या तेलुगु चित्रपटाचा रिमेक  आहे. यामध्ये अॅक्शन, थ्रिलर, रोमान्स आणि सस्पेन्सचा तडका आहे. चार पाच चित्रपटांचे दिग्दर्शन केल्यानंतर अमजद खान एक उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून समोर आले आहेत. कथेला उत्तम पटकथेची जोड देत त्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवेल असा सस्पेन्स असल्याने आपली उत्सुकता शेवट पर्यंत ताणली जाते.

कलाकारांच्या अभिनयाबद्दल सांगायचे तर चित्रपटात टायगरने केलेले स्टंट बघण्यासारखे आहेत. चित्रपटासाठी टायगरने खास हाँगकाँगहून मार्शल आर्ट्सचे धडे घेतले आहेत. त्याने त्याच्या वाट्याला आलेल्या भूमिकेत जीव ओतला आहे. दिशानेही चित्रपटासाठी खास एक्रोबेटिकचे ट्रेनिंग घेतले. तिचाही अभिनय छान झाला आहे. याशिवाय रणदीप हुड्डा, मनोज वाजपेयी, दीपक डोबरियाल या कलाकारांचीही उत्तम साथ या दोघांना मिळाली आहे. प्रतीक बब्बरने व्हिलनच्या भूमिकेतून मस्त कमबॅक केले आहे. त्याचा अभिनय आणि वन लाइनर्स लक्षात राहतील असे आहेत.

आहे. जॅकलिन फर्नांडिसवर चित्रीत झालेल्या तेजाब चित्रपटातील गाजलेल्या ‘एक दो तीन…’ या गाण्याचा रिमेक यात आहे, याशिवाय एका लव्ह स्टोरीत हव्या असलेल्या रोमँटिक गाण्याची कमतरता या चित्रपटात भासते. एकंदरीत सांगायचे तर तुम्ही टायगर श्रॉफ चे चाहते असाल आणि तुम्हाला अॅक्शन, थ्रिलर, रोमान्स आणि सस्पेन्स असलेले सिनेमे आवडत असतील तर ‘बागी २’ तुमाच्यासाठी आहे.

– भूपाल पंडित


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)