अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त सुट्टीची मागणी

पिंपरी – पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास महाराष्ट्रातील जनतेला कळावा, तसेच त्यांनी केलेली कामे, मंदिर, घाट व पाण्याबाबत त्यांनी केलेले व्यवस्थापनाची माहिती व्हावी. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात धनगर समाज आहे.

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचा परिचय जनतेला व्हावा म्हणून जयंती दिवशी 31 मे रोजी शासकीय सुट्टी जाहीर करावी. यापूर्वी चार ते पाच वेळा निवेदन देऊनही याबाबत निर्णय झालेला नाही, असे निवेदनात म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)