अहिनवेवाडी रस्त्यावर बिबट्याच्या हल्ल्‌यात एक जण जखमी

संग्रहित छायाचित्र

ओतूर परिसरात बिबट्याचे हल्ले सुरुच : सारणी फाटयावर हा दुसरा हल्ला

ओतूर – ओतूर-अहिनवेवाडी रोडवरील सारणी फाटा येथे मंगळवारी (दि.12) रात्री बिबट्याने दुचाकीवर झेप मारून केलेल्या हल्ल्‌यात एकजण जखमी झाला. बिबट्याच्या हल्ल्‌यामुळे सारणी, शेटेवाडी, अहिनवेवाडी परिसरातील शेतकरी नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. निवृत्ती पेमा काळे (वय 30, रा. गोंदेवाडी, ओतूर, ता.जुन्नर, जि.पुणे) अशी बिबट्याच्या हल्ल्‌यात जखमी झालेल्या युवकांचे नाव आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले की, मंगळवारी (दि. 12) रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान सुमारास निवृत्ती काळे हे आणि त्याचा एक मित्र दुचाकीवरून अहिनवेवाडीवरून ओतूरकडे येत असताना सारणी फाट्याच्या वळणावर बिबट्याने काळे यांच्या दुचाकीवर अचानक झेप मारली. यात निवृत्ती काळे यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्यावर हल्ला करून जखमी केले आहे. हल्ला केल्यावर बिबट्याने धूम ठोकली. या घटनेची माहिती ओतूर वनविभागाला मिळताच वनरक्षक विशाल अडागळे, वनरक्षक राठोड, वनमजूर कुमठेकर यांनी जखमी युवकांना ओतूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. काळे यांच्यावर वैद्यकिय अधिकारी यादव शेखरे यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुणे पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. या ठिकाणी 25 मे रोजी शितेश चौधरी आणि राहूल चौधरी (रा. उदापूर) या युवकांवरही बिबट्याने हल्ला केला होता. यात दोघेही जखमी झाले होते. दरम्यान, सारणी, अहिनवेवाडी, शेटेवाडी परिसरात वनविभागाने तात्काळ पिंजरा लावावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)