अहिंसादिनी राष्ट्रवादीचे पिंपरीत “मौन आंदोलन’

पिंपरी – केंद्र व राज्य सरकारच्या घोषणा फसव्या असल्याचा आरोप करून त्याचा निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसने मंगळवार दि. 2 ला महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात मौन आंदोलनाने केला. पिंपरीतही राष्ट्रवादीने मौन आंदोलन केले. असत्य-राफेल विमान बनवण्याची एचएएल कंपनीची क्षमता नाही. हिंसा-सनातन संस्थेवर बंदी कधी आणणार? आणि अशांती-कर्जमाफी घोषीत केल्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या का? या आत्महत्यांबद्दल कोणावर 302 कलम लावायचे? असा मजकूर आंदोलनस्थळी फलकावर होता.

पिंपरी, खराळवाडी येथील पक्ष कार्यालयासमोर सकाळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन राष्ट्रवादीच्या मौन आंदोलनाला सुरुवात झाली. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर योगेश बहल, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका सुलक्षणा धर, संगीता ताम्हाणे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, कविता खराडे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, माजी नगरसेविका शमीम पठाण, निलेश पांढारकर, राजेंद्र साळुंखे, विजय लोखंडे, आनंदा यादव सहभागी झाले होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)