अहल्यादेवी जयंतीनिमित्त दोन दिवस सांस्कृतिक कार्यक्रम

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पुण्यश्‍लोक अहल्यादेवी होळकर जयंती उत्सव महिला महोत्सव म्हणून बुधवार (दि.30) व गुरूवार (दि.31) असे दोन दिवस साजरा करण्यात येत आहे. या निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी सोमवारी (दि.27) दिली.

या वेळी नगरसेविका आशा शेंडगे, बीआरटीएसचे प्रवक्ते विजय भोजने आदी उपस्थित होते. महापौर काळजे यांनी सांगितले की, बुधवारी सकाळी 10 ते 11 या वेळेत मुक्त हस्त रांगोळी स्पर्धा, सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत तिखट व गोड नाष्टाचे पदार्थाची पाककला स्पर्धा, दुपारी 12 ते 1 या वेळेत मेंहदी स्पर्धा आणि दुपारी 2 ते 3 या वेळेत वेशभुषा स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धा नवी सांगवी येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे होणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुसऱ्या दिवशी गुरूवारी सकाळी नऊला सागंवीतील अहल्यादेवी पुतळा येथे सांगलीतील कलाकाराचे गजीनृत्य होणार आहे. मोरवाडी चौकातील सकाळी साडेनऊला अहल्यादेवी पुतळा येथे शाहिर सुरेशराव सुर्यवंशी यांचा पोवाडा आहे. तसेच, दोन्ही पुतळ्यांना महापौरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येईल. मोरवाडी चौकात सकाळी साडेदहाला महिला महोत्सवातील स्पर्धेचे बक्षीस वितरण आहे. त्यानंतर धनगरी ओव्या गीत-संगीता’चा कार्यक्रम संदीप उबाळ, योगिता गोडबोले व मानसी दातार सादर करणार आहेत. सदर कार्यक्रमाचा आस्वाद नागरिकांना घ्यावा, असे आवाहन महापौर काळजे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)