अहल्यादेवींच्या मेघडंबरीवरील रोषणाईने बारामतीकरांचे पारणे फेडले

बारामती- राष्ट्रमाता पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांची 292 वी जंयती उत्सवानिमित्त सिनेमा रस्त्यावरील राष्ट्रमाता पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठान व संस्थापक अध्यक्ष निलेश धालपे यांच्या वतीने साकरण्यात आलेल्या मेघडंबरीवरील रोषणाईने बारामतीकरांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
निलेश धालपे म्हणाले की, दर वर्षीच्या परंपरेला अनुसरून या वर्षी ज्या अहिल्यमातेने काश्‍मीर पासून कन्याकुमारी पर्यंत लोक कल्याणकारी कार्य केले त्या कार्याचा गौरव म्हणून यावर्षी मध्यप्रदेश इंदैर मधील देवी अहिल्या मेघडंबरी प्रतिष्ठानच्या वतीन बारामतीत तयार करण्यात आली होती त्याचे वैशिष्ट्य म्हणजे 20 फूट लांब 35 फूट उंच ही मेघडंबरी होती त्यावर नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली होती संध्याकाळच्यावेळी ही रोषणाई बारामतीकरांच्या डोळ्याचे पारणे फेडत होती, असे वैशिष्ट्यपूर्ण देखावे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी अहिल्यादेवी जंयतीसाठी साकारण्यात येतात.
आज पर्यंत श्रीक्षेत्र जेजुरी खंडोबा मंदिर, 12जोर्तिलिंग जिर्णोद्दार, अहल्या किल्ला असे अनेक अहल्यादेवीच्या जिवणावरील देखावे प्रतिष्ठानच्या माध्यमातून साकारण्यात आले आहेत. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून वृक्षरोपण, रक्‍तदान शिबिर, अन्नदान, वारकरी संप्रदायासाठी जेवण, चहा, नाश्‍ता व जंयती उत्सव निमित्त पहाटे पाच वाजता श्री सिद्धेश्‍वर, श्री काशिविश्‍वेश्‍वर, श्री रामेश्‍वर, श्री पंढरेश्‍वर मंदिरात अभिषेक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते. तर सकाळी अहल्यादेवीच्या मुर्तीचे पूजन व अहल्यादेवी चौक बारामती फलकाचे पूजन मान्यवरांचा व पत्रकारबंधुचा सत्कार करण्यात आले. दुपारी जंयती मिरवणूकीचे व बंधवाचे स्वागत संस्थापक अध्यक्ष निलेश धालपे व नागेश नागे, अशिष घोरपडे, अक्षय मोरे, अनिकेत धालपे, मंगेश पवार, आनंद खुळपे, आश्‍विन भोकरे, चेतन वाडेकर व इतरांनी केले. अहल्यादेवीच्या मुर्तीस पुष्पाहार घालण्यात आला व आतिषबाजी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)