अहमद पटेल कॉंग्रेसचे नवीन खजिनदार

नवी दिल्ली – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य अहमद पटेल यांची पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या खजिनदार पदी नियुक्ती केली आहे. विद्यमान खजिनदार मोतीलाल व्होरा यांना त्या पदावरून सरचिटणीस प्रशासन या पदावर नियुक्त केले आहे. अहमद पटेल हे सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार म्हणून काम करीत होते. त्यांनी या आधीही पक्षाचे खजिनदार म्हणून काम केले आहे.

पक्षात अन्यही काहीं नवीन नियुक्‍त्या करण्यात आल्या आहेत. त्यात आनंद शर्मा यांची कॉंग्रेसच्या विदेश विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या जागी आत्तापर्यंत करण सिंह हे काम पहात होते. त्यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर लोकसभेच्या माजी सभापती मिरा कुमार यांची कॉंग्रेस कार्यकारीणीवर कायम निमंत्रीत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

लुईझिन्हो सालेरिओ यांची सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे ईशान्येकडील राज्यांचा कारभार सोपवण्यात आहे. या जागी सी.पी. जोशी हे काम पहात होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)