अहमदी पंथाच्या आणखी एकाची पाकिस्तानात हत्या

 लाहोर – इस्लामिक कट्टरपंथीयांनी आज अहमदी पंथाच्या एका महिला प्राध्यपकाची आज भोसकून हत्या केल्याचा प्रकार येथे घडला. प्रा ताहिरा मलिक असे हत्या झालेल्या 61 वर्षीय महिलेचे नाव आहे. त्या लाहोर विद्यापीठातील मायक्रो बॉयलॉजिच्या प्राध्यापक होत्या. या प्रकरणी त्यांच्या मुलीने पोलिसांत तक्रार दिली. आपल्या आईच्या घरी आपण फोन केला तरी ती फोन उचलत नसल्याने काही तरी गडबड झाली असावी अशी शंका तिने व्यक्त केली होती. पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन पहाणी केली असता त्यांचा भोसकून खून झाल्याचे दिसून आले. या हत्येची अद्याप कोणत्याही संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली नाही तथापी तालिबान आणि सुन्नीपंथीय अन्य संघटना गेल्या अनेक दिवसांपासून अहमदी पंथीयांची हत्या करीत आहेत. त्यांच्यापैकीच कोणी तरी हे कृत्य केले असावे अशी शक्‍यता पोलिसांनी व्यक्‍त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)