अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन 2023 पर्यंत पूर्ण कार्यान्वित

पाटणा – अहमदाबाद आणि मुंबईदरम्यान धावणारी प्रस्तावित बुलेट ट्रेन 2023 पर्यंत पूर्ण कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. निर्धारित उद्दिष्टाच्या आधी म्हणजे 2022 मध्येच बुलेट ट्रेनचे काही सेक्‍शन सुरू होण्याची शक्‍यता आहे.

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्‍वनी लोहानी यांनी आज येथे बुलेट ट्रेनसंबंधीची माहिती दिली. या प्रकल्पाबाबत योजनेनुसार आम्ही पुढील प्रगती करत आहोत. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. जपानमध्ये 1965 पासून बुलेट ट्रेन धावत आहे. तेव्हापासून तिथे कुठला अपघात घडलेला नाही. जपानी तंत्रज्ञान आपल्याला लाभले आहे, असे लोहानी यांनी सांगितले. सॉफ्ट फंडिंगमुळे कुठला आर्थिक ताण पडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो.

मागील वर्षी सप्टेंबरमध्ये मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांनी या प्रकल्पावर शिक्कामोर्तब केले. बुलेट ट्रेन कार्यान्वित करण्यासाठी अंदाजे 1 लाख 10 हजार कोटी रूपये इतका खर्च अपेक्षित आहे. त्यातील 88 हजार कोटी रूपयांचा निधी जपान कर्जरूपाने अवघ्या 0.1 टक्का व्याजदराने उपलब्ध करणार आहे. भारतातील पहिली बुलेट ट्रेन कमाल 350 किलोमीटर प्रतितास वेगाने धावेल. त्यामुळे 500 किलोमीटर अंतर कापण्यास तिला अवघ्या तीन तासांचा कालावधी लागेल. बुलेट ट्रेन एका प्रवासात 12 स्थानकांवर थांबेल. त्यातील 4 स्थानके महाराष्ट्रात असतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)