अहमदाबादचे नामकरण आता कर्णावती असे करणार- नितीन पटेल

उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी दर्शवली तयारी 

गांधीनगर: फैजाबाद शहराचे नाव अयोध्या असे करण्यात येईल अशी घोषणा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी केल्यानंतर आता गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनीही अहमदाबादचे नामकरण कर्णावत असे केले जाईल, सरकार त्यासाठी तयार आहे असे प्रतिपादन केले आहे. यात काही कायदेशीर अडचणी नसतील तर हे नामांतर करण्याची सरकारची तयारी आहे असे त्यांनी म्हटले आहे. आज गांधीनगर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. लोकांचा पाठिंबा असेल आणि नामांतर करण्यात काही राजकीय अडचण नसेल तर या नामांतराला काहीं सरकारकडून काही आडकाठी नाही असे ते म्हणाले. हे शहर जागतिक वारसा यादीतील शहर आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अकराव्या शतकात हे शहर वसले त्यावेळी या परिसराला आशावल असे म्हटले जात असे. चालुक्‍य राजा कर्ण यांनी आशावलच्या राजाच्या विरूद्ध युद्ध जिंकून साबरमतीच्या किनारी कर्णावती नगरीची स्थापना केली. 1411 साली सुलतान अहमद शाह नावाच्या एका परकीय आक्रमकाने कर्णावती जवळच आणखी एका शहराची स्थापना केली आणि त्यांनी या शहराला अहमदाबाद असे नाव दिले. त्यावेळी या भागातील चार संतांची नावे अहमद अशी होती. त्यावरून या शहराला हे नाव पडले.

दरम्यान कॉंग्रेसचे प्रवक्ते मनिष दोशी यांनी अशा प्रकारची नामांतरे करणे हा भाजपचा केवळ निवडणूक फंडा आहे अशी प्रतिक्रीया दिली आहे.अयोध्येत राम मंदिर बांधण्याचा विषय उपस्थित करणे, अयोध्येचे, अलाहाबादचे नाव बदलणे ही सारी त्यांची हिंदुंची मते मिळवण्याची खेळी आहे असे त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)