अहमदनगर: 42 गावातील 170 वाडी-वस्त्यांसाठी 51 टॅंकर

संग्रहित छायाचित्र

नगर – तहानलेल्या गावांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी 42 गावांतील आणि 170 वाडी-वस्त्यांसाठी 51 टॅंकर मंजूर झाले आहेत. तालुकास्तरावरुन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टॅंकर सुरु करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे दाखल करण्यात येत आहेत. त्यावर जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदींच्या मंजुरीची मोहोर उमटत आहे.

पाच तालुक्‍यातून आलेल्या प्रस्तावावरुन 42 गावांसाठी 170 वाडी-वस्त्यांसाठी एकूण 93 हजार 913 लोकसंख्या असलेल्या गावांना टॅंकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यात शासकीय 15 तर खासगी 36 असे एकूण 51 टॅंकर सुरू आहे. यातील मंजूर खेपा 148 असून, यातील झालेल्या खेपा 125 आहे तर न झालेल्या 23 आहे. त्यात सर्वाधिक टॅंकरच्या 51 खेपा संगमनेर तालुक्‍यात झाल्या असून, त्याखालोखाल पारनेर येथे 37 खेपा झाल्या आहे. यंदा टॅंकर सुरु करण्याची मागणी करणारे प्रस्ताव सर्वप्रथम संगमनेर तालुक्‍यातून दाखल झाले होते. 11 एप्रिल रोजी वरवंडी, वनकुटे आणि कर्जुले पठार या गावांना टॅंकर मंजूर करण्यात आले. त्यानंतरच्या कालावधीत संगमनेर, अकोले, नगर, पारनेर पाथर्डी तालुक्‍यातील 42 गावातील 170 वाडी-वस्त्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी 51 टॅंकर जिल्हा प्रशासनाने मंजूर केले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)