अहमदनगर: स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंच्या कलागुनांना वाव

सुपा – टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जाते. क्रिकेट खेळण्यासाठी पुरेसे मैदान उपलब्ध नसतांनाही खेळाडू भरपूर मेहनत घेतात व स्पर्धांमध्ये उतरल्यानंतर आपल्यातील गुण दाखण्याची संधी त्यांना मिळत असते, आणि त्यातुनच गुणवंत क्रिकेटपट्टू घडत असल्याचे प्रतिपादन लोकनेते निलेश लंके यांनी केले. घाणेगाव (ता. पारनेर) येथील क्रिकेट क्‍लब आयोजित हापपिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धचे उद्‌घाटन निलेश लंके यांच्या हस्ते शनिवारी (दि. 26) झाले यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी सरपंच मंदाकिनी मोहन वाबळे, सेवा सोसायटीचे अध्यक्ष अनिल वाबळे, निलेश लंके प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सुरेश शिंगोटे, रामदास शिंदे, गिताराम सालके, रुपेश गुंड, विशाल म्हस्के, निलेश परांडे, गणेश परांडे आदी यावेळी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी लंके यांच्या वतीने प्रथम बक्षिस 11 हजार, पंचायत समितीचे उपसभापती दिपक पवार, अध्यक्ष अनिल वाबळे यांच्या वतीने द्वितीय बक्षिस 9 हजार, रोहीत एंटरप्रायजेस पुणे पोपट मारुती वाबळे यांच्या वतीने तृतीय बक्षिस 7 हजार, तर रामदास शंकर शिंदे यांच्या वतीने चतुर्थ बक्षिस 4 हजार रुपये देण्यात येणार आहे. यासह उत्कृष्ठ संघ, उत्कृष्ठ गोलंदाज, उत्कृष्ठ फलंदाज, उत्कृष्ठ खेळाडू यासाठी वैयक्तीक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. परिसरातील क्रिकेट संघांनी या स्पर्धेचा लाभ घेण्याचे आवाहन लंके प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सुरेश शिंगोटे, संकेत वाबळे, बालु म्हस्के, अमोल वाबळे, अभिषेक परांडे, कानिफनाथ शिंगोटे, नितीन वाबळे, योगेश शिंदे, शुभम म्हस्के, तुषार वाबळे, सौरभ वाबळे, विशाल म्हस्के, संदिप वाबळे, निलेश परांडे, गणेश शिंगोटे, गणेश परांडे, सिध्देश शिंगोटे आदींनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)