अहमदनगर: संजीवनीच्या 11 विद्यार्थ्यांची वाहन निरीक्षकसाठी निवड

एमपीएससी परीक्षेत एकाच वेळी संजीवनीचा मोठा सहभाग

कोपरगाव- महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) सहायक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या 9 व संजीवनी पॉलिटेक्‍निकच्या 2 अशा 11 विद्यार्थ्यांची सहायक मोटार वाहन निरीक्षक पदावर निवड झाली आहे.

संजीवनीच्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हमार्फत विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळवून देण्यासाठी प्रयत्नांबरोबरच एम.पी.एस.सी. व यु.पी.एस.सी. परीक्षांचे मार्गदर्शनही दिले जाते. याची फलश्रुती म्हणून एकाच बॅचमध्ये तब्बल 11 विद्यार्थ्यांची वर्णी शासकीय सेवेत लागली आहे. संजीवनीच्या वतीने या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र, प्रमोद आरगडे, गुलाब सोलंके, देवेंद्रप्रसाद सोनार, राजश्री सोळके एवढेच सत्कारासाठी उपस्थित राहू शकले. या वेळी त्यांचा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्‌सचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, प्राचार्य डॉ. डी. एन. क्‍यातनवार, उपप्राचार्य डॉ. ए. जी. ठाकूर, पॉलिटेक्‍निकचे प्राचार्य ए. आर. मिरीकर, संगणकतज्ज्ञ विजय नायडू व विरेश अग्रवाल उपस्थित होते.

उपस्थित चार विद्यार्थ्यांसह प्रवीण हारदे, अमोल सरकटे, सुनील गिते, महेश बोजणे, संदीप तुरकणे व पॉलिटेक्‍निकचे चैतन्य आढाव आणि शीतल तळपे यांची सहायक मोटर वाहन निरीक्षक पदावर निवड झाली. यापूर्वीही संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाने शासकीय सेवेतील माजी विद्यार्थ्यांना बोलावून सत्कार केला होता. त्यावेळी सुध्दा 65 अभियंते आले होते. अनेक माजी विद्यार्थी आज शासकीय सेवेत कार्यरत आहेत.
सहायक मोटार वाहन निरीक्षक पदावर निवड झालेल्या सत्कारार्थींनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, संजीवनीमध्ये शिक्षण घेत असताना दिलेल्या स्पर्धात्मक परीक्षांचे प्रशिक्षण आम्हाला उपयोगी पडले. याचबरोबर आमच्या अभ्यासातील सर्व विषयांचा येथे शिकत असताना सखोल अभ्यास झाला. त्यामुळे एमपीएससी परीक्षेमध्ये आम्हाला सहजरीत्या यश मिळाले.

या निवडीबद्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्‌सचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव कोल्हे, आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योगसमूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, नितीन कोल्हे, अमित कोल्हे यांनी अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)