सराला येथील प्रकार, सहा जणांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर – गोदावरी नदीतून वाळू चोरी करताना पकडलेला डंपर तस्करांनी पळवला. डंपर पळवताना माहिती पुरवणाऱ्या एका ग्रामस्थासह कोतवालाला काही तस्करांनी पकडून ठेवल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सराला गावच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला.
तलाठी हेमंत डहाळे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुड्डू यादव, सनी बोरुडे, सरफराज (पूर्ण नाव माहिती नाही), डंपरवरील चालक व इतर दोघांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

तहसीलदार सुभाष दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोदावरी नदीपात्रातून वाळूतस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कोतवाल संदीप नवसरे यांनी काही ग्रामस्थांच्या मदतीने सकाळी सातच्या सुमारास नदीपात्रातून वाळू चोरून नेणारा डंपर (क्रमांक एमएच- 4-एसीजी-8797) पकडला. त्यांनी ही माहिती तलाठी डहाळे यांना व मला दिली. आम्ही तातडीने सराला गावाकडे निघालो. मात्र, आम्हाला तेथे पोहोचण्यापूर्वी वाळूउपसा करणाऱ्यांनी डंपर पळवला. डहाळे यांनी फिर्याद दिल्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)