अहमदनगर: वहिनीला माहेरी घेऊन जाण्यास विरोध करणाऱ्या दीराचा खून

शिर्डी – वहिनीला माहेरी घेऊन जाण्यास विरोध करणाऱ्या दीराला मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना शिर्डीत घडली. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहा जणांनी येथील बाजारतळावरून त्याला रिक्षात घालून लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

शाहरुख शिवराम चव्हाण (रा.कोपरगाव), असे मृत दिराचे नाव आहे. कीर्ती दोगऱ्या चव्हाण (वय 17, रा. लक्ष्मीनगर, कोपरगाव) यांनी शिर्डी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की दि.26 जून रोजी दुपारी शिर्डी बाजारतळावर आमच्या समाजाची बैठक झाली होती. त्या बैठकीत माझ्या नवऱ्याला घटस्फोट देण्यात आला. त्यानंतर माझी आई मंदा वायसर काळे, वडील वायसर जीमदा काळे, भाऊ शरद वायसर काळे, चुलते कल्या जीमदा काळे, रामशेट्या आमऱ्या भोसल्या, विनोद रामशेट्या भोसल्या (सर्व रा. खडकी, ता. जि. नगर) हे मला माहेराला घेऊन जाण्यासाठी नेत होते. त्यावेळी माझा दीर शाहरुख शिवराम चव्हाण (रा. कोपरगाव) याने माहेर घेऊन जाण्यास विरोध केला. त्या रागातून माहेरच्या माणसांनी त्याला लाथाबुक्‍याने मारहाण केली. येथून त्याला रिक्षातून बाहेर नेले. त्याला मारहाण करून त्याचा खून करून त्याचा मृतदेह कोपरगाव येथे आमच्या घरोसमोर आणून टाकला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आरोपी मंदा वायसर काळे हिला शिर्डी पोलिसांनी तातडीने अटक केली. पोलिसांनी आरोपी मंदा काळे हिला राहाता न्यायालयात हजर केले असता तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप कहाळे पो. ना. किरण कुऱ्हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)