अहमदनगर: रिक्षा स्टॉप शाखेच्या फलकाचे अनावरण

नगर,दि. 24 (प्रतिनिधी)- माळीवाडा बस स्थानक येथील जिल्हा रिक्षा पंचायत संलग्न सन्मित्र रिक्षा स्टॉप शाखेच्या फलकाचे अनावरण संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी स्टॉपचे अध्यक्ष सलिम शेख, उपाध्यक्ष सुलतान पठाण, दत्तात्रय साबळे, रिक्षा पंचायतचे उपाध्यक्ष ताजोद्दीन मोमीन, सचिन बडेकर, शाहू लंगोटे, सचिव विजू शेलार, अशोक शिंदे, कार्याध्यक्ष हाजी गुलामदस्तगीर शेख, सुनिल पवार, निर्मल गायकवाड, उत्तम पाटोळे, सागर काळभोर, फिरोज तांबोळी, समीर कुरेशी, बबन पाटोळे, फिरोज शेख, रामदास शिंदे, गणेश आखमोडे आदि उपस्थित होते.
प्रास्ताविकात सलिम शेख यांनी प्रवाश्‍यांना सुरक्षितता व उत्तम प्रकारची सेवा देण्याचा प्रयतक्‍ स्टॉपचे रिक्षा चालक करीत आहे. रिक्षा चालकांचे अनेक प्रश्‍न संघटनेच्या पाठपुराव्याने मार्गी लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाहुण्यांचे स्वागत सुलतान पठाण यांनी केले.
वैभव जगताप म्हणाले की, रिक्षा चालकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्याला यश येवून शासनाने रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्याचे लाभ सर्व रिक्षा चालकांना मिळण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून, रिक्षा चालकांना संघटित करुन अनेक प्रश्‍न मार्गी लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ताजोद्दीन मोमीन यांनी रिक्षा चालकांच्या एकीच्या बळाद्वारे शासनाला मागण्या मान्य कराव्या लागल्या आहेत. रिक्षा चालकांनी देखील संघटनेच्या माध्यमातून एकत्र येण्याची गरज असून, संघटनेचे सभासद होण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी रिक्षा पंचायतचे सभासद विशाल खांडरे, इरफान शेख, राजू शेख, राजू दहिहंडे, दत्ता भांबळ, राजू हिवाळे, राजू थोरात, रामदास माणेकर, शकील शेख, नितीन देवंडे, छोटू साळवे, राजू वाळके, सुरेश दहिहंडे, राजेश साळवे, ज्ञानेश्‍वर सुंभे, मुन्ना शेख, वसिम शेख, विजू साळवे, बाबा कर्पे, दिपक बनसोडे, नेहुल धायमुक्ते, आदम शेख आदि उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)