अहमदनगर: रस्तालूट करणाऱ्या चौघांना अटक

दोघेपळालेः निमगाव खैरी-नाऊर दरम्यान कारवाई
गावठी कट्टा, काडतूस, चाकू, दोन दुचाकी हस्तगत

श्रीरामपूर – तालुक्‍यातील निमगावखैरी- नाऊर दरम्यान रस्तालूट करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्‍या आवळल्या. शनिवारी रात्री नाकाबंदी करत पोलिसांनी चौघांकडून गावठी कट्टा, काडतूस, चाकू, दोन दुचाकी व इतर साहित्य हस्तगत केले.

दोघेअंधाराचा फायदा घेत फरार झाले. रात्री दीडच्या सुमारास नाऊर- निमगावखैरी रस्त्यावर दोन दुचाकी आडव्या लावून 6 जण रस्तालूट करत असल्याची माहिती उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरेयांना मिळाली होती. त्यानंतर वाघचौरे, निरीक्षक वसंत पथवे यांच्यासह पथकानेया रस्त्यावर नाकाबंदी केली. घटनास्थळी जावून सशस्त्र पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. चौघांना पकडण्यात यश आलेआणि दोघे पळून गेले.

प्रशांत लेकुरवाळे, नागेश उंदरे, सागर अप्पासाहेब दुशिंग, प्रताप भाऊसाहेब वदक (सर्वराहणार खैरीनिमगाव) अशी अटक केलेल्यांची नावेआहेत. योगेश परदेशी व गणेश शेजूळ पळून गेले. ताब्यात घेतलेल्यांची तपासणी केली असता गावठी कट्टा, अमेरिकन काडतूस, चाकू, चार हातमोजे, दांडा, दोरी आणि दोन दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)