अहमदनगर: येसवडी चारीचे पाणी करमनवाडीत पोहचलेच नाही

खेड – कर्जत तालुक्‍यातील येसवडी कुकडी चारीला उन्हाळी आवर्तनाचे पाणी सोडण्यात आले. पाणी कमी दाबाने सुटल्याने टेलच्या येसवडी, करमनवाडी भागात पोहोचले नाही. यावर शेतकऱ्यांनी बुधवारी बैठक घेतली.

कुकडी चारी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष शशिकांत लिहिणे यांनी अभियंता साठे यांना संपर्क करून पाण्याबाबत विचारणा केली. यावेळी त्यांनी पाणी बंद झाल्याचे सांगण्यात आले.
निवेदन देऊन कायदेशीर लढा देण्याचा इशारा लिहिणे यांनी दिला. या चारीवरील धालवडी, तळवडी, बारडगाव दगडी या भागात मंगळवारी पाणी आले. परंतु, पाणी कमी दाबाने व अधूनमधून बंद होत असल्याने तेथेही पिकांना पुरेसे पाणी देता आले नाही.

काही भागात चारीचे पाणी न पोहोचल्याने चर्चा करण्यासाठी झालेल्या बैठकीला बापूराव सुपेकर, मोहन सुपेकर, शशिकांत लिहिणे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. अशोक पावणे म्हणाले की, संघर्ष केल्याशिवाय पाणी मिळत नसेल तर आंदोलन करावेच लागेल. सोबत कायदेशीर पध्दतीने लढा देऊन हक्काचे पाणी मिळवू, असा इशाराही त्यांनी दिला. पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुंड यांनीही धुमकाई फाटा येथे येऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)