अहमदनगर: मुळा नदी दुथडी भरून वाहू लागली

संगमनेर – संगमनेर तालुक्‍यातील घारगाव, अकलापूर, साकूर परिसरासाठी वरदान ठरलेली मुळा नदी तुडूंब भरून वाहू लागण्याने नदीकाठच्या गावांचा पाणीटंचाईचा प्रश्न मिटणार आहे. शेतकरी वर्गामध्ये यामुळे समाधान व्यक्त होत असून, आज ठिकठिकाणी नदीच्या पाण्याचे पूजन करण्यात आले.

अकोले तालुक्‍यात सध्या जोरदार मॉन्सूनचा पाऊस पडत आहे. यामुळे या भागातील पाणलोट क्षेत्रात पाणीपातळीत वाढ झाली आहे. मुळा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. “मुळा’चे पाणी बुधवारी (दि. 27) मध्यरात्रीच्या सुमारास संगमनेर तालुक्‍यातील घारगाव परिसरात आले. यामुळे शेतकरी वर्गाच्या आनंदाला उधाण आले. सकाळनंतर या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाल्याने घारगाव, अकलापूर, साकूर परिसरात नदी भरून वाहू लागली. अनेक महिन्यांपासून दुष्काळाचा सामना करत असलेल्या या नदीकाठच्या गावांना त्यामुळे मोठा आधार मिळाला आहे. पाणीटंचाईचे संकट दूर होणार असल्याने नदीकाठच्या गावोगावच्या शेतकऱ्यांनी, महिलांनी पाणी पूजन केले. हा मॉन्सून पाऊस पठार भागातही सर्वदूर पडत असल्याने खरीप पिकांना जीवनदान मिळणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)