अहमदनगर: महिन्यापासून अंधारात असणा-या घरात पडणार प्रकाश

कोपरगाव शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचा वीज कंपनीला दणका

कोपरगाव – कोपरगाव तालुक्‍यामधील भोजडे पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांचे गेल्या महिन्यांपासून घरगुती वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे व वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने अखेर सर्वांनी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाकडे लेखी तक्रार केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने संपर्कप्रमुख दत्ताजी आव्हाड व कक्ष जिल्हाप्रमुख मुकुंद सिनगर यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा नेऊन दणका दिल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले असल्याची माहिती पत्रकांराना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने देण्यात आली.

वीज वितरण कंपनीच्या अधिका-यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हठले आहे कि, मौजे भोजडे येथील बुआसाहेब मंदीर रोड (कान्हेगाव -भोजडे शिवरस्ता) येथील रोहित्रे बंदइ असल्याने त्या लगत शेतकरी रहिवासी गेल्या कित्येक दिवसापासुन अंधारात आहेत. वारंवार संपर्क साधला तक्रारी केल्या.परंतु आपल्या कार्यालयाकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. उलट शेतक-यांना अपमानसपद वागणुक मिळाली. शेतक-यांनी वीज बिले नाही परंतू घरगुती बिले नियमित भरलेली आहेत.

एका बाजूला केंद्र सरकारची अक्षय प्रकाश योजना मोठ्या थाटामाटात सुरू असून प्रत्यक्षात अधिकारी मात्र शेतकरी बांधवांना जाणीवपूर्वक अंधारात ठेवत असल्याचा आरोप कक्ष जिल्हाप्रमुख मुकूंद सिनगर यांनी केला. संबधीत कनिष्ठ अभियंता आहेर यांना भेटून जाब विचारला असता तात्काळ बंद वीज रोहित्र सुरू करून वीज पुरवठा सुरू करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. असेही त्यानी सांगीतले.

यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकरी बांधवांची माफी मागितली व घरगुती वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांवर यापुढे अन्याय होणार नसल्याची ग्वाही दिली.
यावेळी कक्ष उपजिल्हाप्रमुख र.फ.शिंदे, कक्ष तालुकाप्रमुख अनिल राहणे, कक्ष शहरप्रमुख रविंद कथले, कक्ष उपशहरप्रमुख माधव आहेर, शिर्डी कक्ष शहरप्रमुख रवि सोनवणे, उपकक्षप्रमुख राजू गाडेकर, कक्षशाखाप्रमुख रिंकेश जाधव यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)