अहमदनगर बॅकस्टेज आटिॅस्टस असोसिएशनचे आयोजन ः संगीत क्षेत्रासाठी नवे व्यासपीठ

डिसेंबरमध्ये राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धा
नगर – कुठल्याही शहराची ओळख हि तेथील सांस्कृतिक चळवळ व रसिक कलाकारांच्या कार्यावर अवलंबून असते. संगीत,नाट्य,कला आदीचा विकास व्हावा या हेतूने अहमदनगर बॅकस्टेज आटिॅस्टस असोसिएशन संस्था कार्यरत असून नव्या कलाकारांना संधी मिळावी व नगरच्या रसिकांना संगीताचा आनंद उपलब्ध व्हावा या हेतूने प्रथमच राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धेचे डिसेंबर मध्ये आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धा 15 व 16 डिसेंबर ला सलग दोन दिवस सावेडीतील माऊली सभागृह येथे होणार आहेत.17 ते 25 वयोगटात होणाऱ्या या स्पर्धेसाठी स्पर्धकांनी महाविद्यालयातून बोनाफाईड प्रमाणपत्र जोडणे आवश्‍यक आहे.स्पर्धकांनी दोन गाणी 10 मिनीटात सादर करावयाची आहेत.
कलेविषयी प्रेम व नव्या पिढीला सांस्कृतिक देणे हि बांधिलकी जोपासून नगरचे सांस्कृतिक आरोग्य वृद्धीसाठी हा उपक्रम राबविण्याचा हेतू संस्थेचे अध्यक्ष कलाकार मिलिंद शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.त्यातूनच संगीत क्षेत्रात चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची कल्पना पुढे आली. बॅकस्टेज आर्टिस्टस असोसिएशन चे ब्रीदच मुळात गगन भरारी घेणाऱ्याला मदतकरूया असे आहे असे शिंदे म्हणाले. स्पर्धा समन्वयक सीए. ज्ञानेश कुलकर्णी, कामोद खराडे,अमित काळे यांनीही स्पर्धे विषयी माहिती दिली.
प्रथम क्रमांक विजेत्यास रुपये 15 हजार, द्वितीय 11 हजार व तृतीय 7 हजार रुपयांचे पारितोषिक असून सोबत प्रमाणपत्र व मानचिन्ह देण्यात येईल.
स्पर्धेचे माहितीपत्रक व प्रवेश फॉर्म सर्व महाविद्यालय ,संगीत विद्यालयात लवकरच उपलब्ध केले जातील.तसेच ऑनलाईन प्रवेशिका भरण्याची सुविधा हि संस्थेच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात येणार आहे.
अहमदनगर बॅकस्टेज आटिॅस्टस असोसिएशन चित्रपट तसेच नाट्यक्षेत्रातील नवोदितासाठी आवश्‍यक असलेल्या काव्यवाचन व कथाकथन स्पर्धांचे व्यासपीठ आहे.संस्थेतर्फे सलग 17 वर्ष आंतरशालेय कथाकथन स्पर्धा होत आहेत.2002ते 2011 मध्ये राज्यस्तरीय एक व्यक्ती बहुपात्री या स्पर्धा गेली 10 वर्ष घेण्यात आल्या.2011 पासून सुरु करण्यात आलेली राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धाही उत्तम रित्या सुरु आहे. यावेळी अभिजित क्षिरसागर ,संतोष बडे,सागर जोशी,विक्रांत मनवेलिकर,योगेश कुलकर्णी,दादासाहेब बेरड,गौरव मिरीकर,विवेक घोलप उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)