अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गाला गोपीनाथ मुंडे यांचे नाव

बीड : अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे अनेक वर्षांचे स्वप्न साकार होत आहे. या रेल्वेमार्गाचे कामकाज सुरू झालेले असताना या रेल्वेमार्गाला स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे यांचे नाव द्यावे, असा ठराव बीड जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या या ठरावाला सर्वांनीच पाठिंबा देत तो पारित करण्यात आला. अहमदनगर-बीड-परळी हा रेल्वेमार्ग लवकरच दृष्टीक्षेपात येणार आहे. रेल्वे मार्गाचे काम प्रगती पथावर असून पहिल्या टप्प्यातील अहमदनगर ते नारायणडोह रेल्वेमार्ग जवळपास पूर्ण होत आला आहे. बीड जिल्हा रेल्वेच्या नकाशावर आणण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी अनेक वर्षे प्रयत्न केले. या मार्गाला मंजुरी मिळाली आणि कामही सुरु झाले. मात्र त्यांच्या हयातीत हा मार्ग प्रत्यक्षात येऊ शकला नाही. त्यामुळे या रेल्वमार्गाला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी बीड जिल्ह्यातून जोर धरत होती. अखेर जिल्हा परिषदेने त्याला एकमताने मंजुरी दिली. या रेल्वे मार्गाच्या नामकरणाची पहिली पायरी आता पार पडली आहे. यापुढे नामकरणाची पुढील प्रक्रिया होईल. 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान मोदींनीही गोपीनाथ मुंडे यांच्या स्वप्नातील रेल्वे मार्ग लवकरच पूर्ण करु, असं आश्वासन बीडमध्ये झालेल्या सभेत दिलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)