अहमदनगर: बालिकाश्रम परिसरातील पाणी प्रश्‍न सोडविण्याचीे सुचना

नगर – प्रभाग 13, बालिकाश्रम परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा समस्या या तात्काळ सोडविण्याच्या सुचना उपमहापौर अनिल बोरुडे यांनी देऊन अधिकाऱ्यांनी हा प्रश्‍न गांभिर्याने घेऊन आगामी काळात तेथील नागरिकांना याचा त्रास पुन्हा होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

बालिकाश्रम परिसरातील नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न काही दिवसांपासून सुरु होता. वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणीही झाली होती. उपमहापौर अनिल बोरुडे यांनी तात्काळ याची दखल घेत समक्ष या प्रभागात आले.जेथे समस्या उदभवली आहे, तेथील नागरिकांशी थेट संवाद साधला यावेळी मनपाचे अधिकारी शिंदे व दिंडे तसेच प्रभागातील नागरिक यावेळी उपस्थित होते. नागरिकांनी यावेळी या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होतो, तसेच काही ठिकाणी पाणी कमी वेळ राहते यासह विविध समस्या मांडल्या. कायम स्वरुपी हा प्रश्‍न सोडवावा, अशी मागणीही यावेळी उपमहापौर बोरुडे यांच्याकडे केली.

यावेळी बोलतांना उपमहापौर अनिल बोरुडे यांनी या प्रभागात पिण्याच्या पाण्याचा समस्या निश्‍चितपणे सोडविल्या जातील. कोणीचीही तक्रार येणार नाही, याची आपण दक्षता घेऊ तसेच या ठिकाणी पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी याची काळजी घेऊन वेळेत व मुबलक पाणी पुरवठा होईल, हे समक्ष येवून पाहणी करावी. व त्यानंतर नागरिकांशी त्यांनी याबाबत केलेल्या तक्रारीचे निरसन झाले की नाही, हे सुद्धा पहावे. कोणत्याही प्रकारे नागरिकांना त्रास होणार नाही, याची दखल घ्यावी व पाण्याचा प्रश्‍न सोडवावा, अशा सूचनाही दिल्या.
उपमहापौर अनिल बोरुडे यांनी या ठिकाणी समक्ष भेट देऊन येथील रहिवाशांना पाणी प्रश्‍नाबाबत मत जाणून घेतल्याबद्दल नागरिकांना दिलासा मिळाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)