अहमदनगर: बाजार समितीत किरकोळ डाळींब विक्रीस परवानगी द्यावी

शनिवारी गेट बंद आंदोलनाचा इशारा ः शिवसेनेचे बाजार समितीला निवेदन

नगर- नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने डाळींबाचे लिलाव नेप्ती उपबाजारात करण्याचा निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे नगरच्या बाजार समितीत किरकोळ माल घेवून आलेल्या डाळींब उत्पादकांना तिथे थांबू न देता नेप्ती उपबाजारात पाठविण्यात येते आहे. बाजार समिती प्रशासनाच्या या धोरणामुळे किरकोळ स्वरुपात डाळींब आणणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण होत आहे. ठोक विक्रीसाठी नेप्ती बाजार योग्य असून किरकोळ विक्री नगर बाजार समितीतच चालू ठेवण्याची मागणी डाळींब उत्पादकांनी केली आहे. बाजार समितीने डाळींब उत्पादकांचे नुकसान करणारा निर्णय तातडीने बदलावा अशी मागणी करीत शनिवारी डाळींब उत्पादकांसह बाजार समितीचे गेट बंद आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे सदस्य संदेश कार्ले यांनी दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगर तालुका बाजार समितीने चार दिवसांपासून लहान मोठ्या सर्व डाळींब उत्पादकांना मुख्य बाजार समितीत माल विक्रीसाठी आणण्यास मनाई केली आहे. सर्वांनाच नेप्ती उपबाजारात जाण्यास सांगण्यात येत आहे. सकाळी चार पाच कॅरेट माल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना हुसकावून लावण्यात येत असल्याने कार्ले यांनी शेतकऱ्यांची भेट घेवून त्यांची अडचण समजून घेतली व याबाबत आवाज उठवला आहे. बाजार समितीने डाळींब उत्पादकांवर अन्याय करू नये, अशी मागणी बाजार समितीला निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. जि.प.सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, पं.स.सभापती रामदास भोर, बाळासाहेब हराळ, राजू भगत शेतकरी सुभाष गुंजाळ, शिवाजी दुसुंगे, पवन गुंजाळ, विजय गायकवाड, आदिनाथ लाडंगे आदींनी हे निवेदन दिले आहे.

नेप्ती उपबाजारात डाळींबाचा लिलाव दुपारनंतर सुरू होतो. याठिकाणी एक दोनच व्यापारी असून किरकोळ माल घेवून एवढ्या लांब जाणे डाळींब उत्पादकांना परवडत नाही. नगरच्या बाजारात मिळणार्या दराच्या तुलनेत नेप्ती उपबाजारात मिळणारा दरही कमी असतो. त्यामुळे लहान स्वरुपात माल विक्रीसाठी आणणार्या डाळींब उत्पादकांना नगर बाजार समितीतच जागा द्यावी. याठिकाणी अन्य फळांचा बाजार भरतो. परंतु, डाळींबाला त्यातून वगळण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. शिवसेनेने या प्रकाराची गंभीर दखल घेत डाळींब उत्पादकांवरील अन्याय दूर होण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)