अहमदनगर: बागुल कुटुंबाला महावितरणचा आधार

संगमनेर – संगमनेर तालुक्‍यातील घारगाव येथील वीज वितरण कंपनीचे तंत्रज्ञ बाळू तुकाराम बागुल (वय 35) यांच्या आकस्मिक निधनाने बागुल कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. पण माणुसकीचा एक हात पुढे करत संगमनेर विज वितरण कंपनी विभागाचे अधिकारी व कर्मचारी एकत्र आल. त्यांनी 3 लाख 3 हजार रुपयांचा धनादेश बागुल यांच्या कुटुंबाला दिला. त्यामुळे बागुल कुटुंबाला एक प्रकारे मोठा आधार मिळाला आहे.

याबाबत माहिती अशी की, बाळू बागुल हे मुळचे नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्‍यातील कपाळेश्वर याठिकाणी आपल्या कुटुंबासोबत राहत होते. पण हल्ली ते वायरमन म्हणून घारगाव वीज वितरणमध्ये तंत्रज्ञ (टेक्‍नीशियन) या पदावर काम करत होते. एठेवाडी परिसरात वीज बिले वसूल करण्याचे काम करत होते. पण अचानक मंगळवार दि. 27 मार्च 2018 रोजी बागुल यांना त्रास होऊ लागला. त्यांना संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालयात औषधोपचारासाठी आणले असता त्यांचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे.
स्व.बागुल यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्यामुळे संगमनेर विज वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता डी.बी.गोसावी यांनी बागुल यांच्या कुटुंबाला मदत करण्याचा प्रस्ताव अधिकारी व कर्मचारी यांच्यापुढे मांडला. त्यानंतर सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्रीत येत स्वइच्छेने मदत देण्यास सुरुवात केली. एकूण 3 लाख 3 हजार रुपये जमा झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या रकमेचा धनादेश स्व.बागुल यांची पत्नी श्रीमती लक्ष्मी बाळू बागुल यांच्याकडे सुपुर्त करण्यात आला. यावेळी कार्यकारी अभियंता डी.बी.गोसावी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस.एस. मुळे, उपकार्यकारी अभियंता बी.एन.पानसरे, आर.एस.घुगे, सी.यु.इंगळे, वाय.एम.देशमुख आदींसह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)