अहमदनगर: पोलीस बंदोबस्तात कचरा गाड्या सुरू

नगर – शहरात गेल्या तीन दिवसांपासून पडून असलेला कचरा बुधवारी रात्री 11 वाजल्यापासून पोलीस बंदोबस्तात उचलण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

सावेडी येथील कचरा डेपोत कचरा टाकण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेससह स्थानिक नागरिकांनी विरोध केला होता. कचरा डेपोमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आल्याने कचरा डेपो हलविण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीने कचरा गाड्या अडविल्या होत्या. यामुळे कचरा तीन दिवसांपासून जागेवरच पडून होता. या समस्येवरून शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात कलगीतुरा रंगला होता. सावेडीतील कचरा डेपोच्या जागेची निवड, कचरा डेपोला मंजुरी, खतप्रकल्पाला राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात मंजुरी देण्यात आली असल्याचा आरोप महापौर सुरेखा कदम यांनी केला, तर शिवसेना सभापतींच्या काळात ठराव मंजूर झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे गटनेते संपत बारस्कर यांनी केला. दरम्यान, बुधवारी सायंकाळी अपर पोलीस अधीक्षक घनश्‍याम पाटील यांची शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन कचरा हलवण्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्याची व अडथळे निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनातर्फे आंदोलकांना नोटिसा बजावण्यात आल्या. यावेळी महापौर सुरेखा कदम, उपमहापौर अनिल बोरुडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहरप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, दिगंबर ढवण, मनपाचे घनकचरा विभागप्रमुख डॉ. पैठणकर, आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)