पाथर्डी – शासनाच्या निष्क्रिय धोरणामुळे पेट्रोल-डिझेल, गॅसचे भाव गगनाला भिडले आहेत. अचानक झालेल्या भाववाढीचा फटका सर्वसामान्यांना बसत असून शासनाने लवकरात लवकर वाढलेल्या किमती कमी कराव्यात, अन्यथा पाथर्डी शहर मनसेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

तहसीलदार नामदेव पाटील यांना दिलेल्या निवेदनावर शहर अध्यक्ष सुभाष घोरपडे, आर. के. चव्हाण, जेम्स साळवे, नवनाथ जिवडे, शरद मोरे, शैलेश शिंदे, संदीप काकडे, जालिंदर दुधाळ, राजीव घोरपडे, राजू तळेकर, आकाश काळोखे, सागर तारटे, राहुल आंधळे, नामदेव मुखेकर आदींच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)