अहमदनगर: पुस्तकांच्या गुढीने साकारला एक नवीन आदर्श

नगर – “”गुढीपाडव्याला पुस्तकांची गुढी उभारून जो नवीन संकल्प आजच्या दिवशी केलेला आहे तो स्तुत्य असा उपक्रम आहे. नाईकवाडी परिवार नेहमीच सामाजिक उपक्रम राबवून समाजाला एक चांगला संदेश देण्याचे काम करत असतात. त्यांनी समाजाला एक नवीन आदर्श निर्माण करून दिलेला आहे,” असे प्रतिपादन नगर शहराचे आ. संग्राम जगताप यांनी केले.

राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य शिवाजी नाईकवाडी यांनी त्यांच्या नालेगाव येथील राहत्या घरी पुस्तकांची सहा फुटी गुढी उभारली होती. त्याप्रसंगी आमदार जगताप प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. खरंतर हा नवीनतम उपक्रम सर्वांनी राबवायला हवा. सर्वांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, “वाचाल तरच जीवनात वाचाल’ या प्रमुख उद्देशाने हा पुस्तकांच्या गुढीचा संकल्प केलेला आहे, असे नाईकवाडी यांनी सांगितले.

एकूण ? च्या वर पुस्तकांचा समावेश या गुढीसाठी केलेला होता. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस वंदन करून ज्ञानज्योती मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आल्या. तसेच, संभाजीराजे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सभागृह नेते गणेश कवडे, मधुमेह मुक्ती केंद्राचे संचालक डॉ. सुबोध देशमुख, सिन्नर येथील महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सौ. कल्पना रेवगडे, सामाजिक कार्यकर्ते अभिजित वाघ,माजी नगरसेवक बहिरनाथ वाकळे, विवाह फोटोज्‌चे संचालक सचिन भोर, मधुकर कोतकर, रावसाहेब कारले, संभाजी निमसे, देशमुख काका,योगेश ठुबे, जालिंदर कोतकर, दादासाहेब पांडुळे, रवी आंबेकर, ऍड. गजेंद्र दांगट, डॉ. अरुण नाईकवाडी, इंजि. संजय शिंदे, अनघा व रवी राऊत आणि नगर राष्ट्र सेवादलाचे सैनिक, नाईकवाडी परिवारातील सर्व सदस्य व सागर नाईकवाडी याचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. याप्रसंगी बऱ्याच मित्रांनी अशा प्रकारची गुढी उभारण्याचा संकल्प सोडला. हेच या उपक्रमाचे फलित ठरले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)