अहमदनगर: पासपोर्ट कार्यालयाला 31 मार्चचा मुहूर्त

खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते होणार उद्‌घाटन

नगर – नागरिकांना परदेशवारी करण्यासाठी सर्वप्रथम आवश्‍यकता असते ती पासपोर्टची. जिल्ह्यातील नागरिकांना यापूर्वी पासपोर्ट मिळवण्यासाठी पुण्याला मुलाखतीसाठी जाणे गरजेचे होते. ऑनलाइन अर्ज करून देखीलही नागरिकांना पुण्याच्या पासपोर्ट कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. यासाठी नागरिकांचा वेळ आणि पैसे दोन्हीही खर्च होत होते. यासाठीच खा. दिलीप गांधी यांनी वेळोवेळी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे जिल्ह्यासाठी स्वतंत्र पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्याबाबत पाठपुरावा केला होता.

या पाठपुराव्यामुळेच परराष्ट्र मंत्रालयाने काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यात स्वतंत्र पासपोर्ट सेवा केंद्राला मंजुरी मिळाल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार शहरातील मुख्य जनरल पोस्ट ऑफिस येथे पासपोर्ट सेवा केंद्राच्या कार्यालय उभारणीचे काम सुरु झाले आणि येत्या 31 मार्च रोजी सकाळी 10 वाजता खासदार दिलीप गांधी यांच्या शुभहस्ते या कार्यालयाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यासाठी विदेश मंत्रालयातील पासपोर्ट विभागाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)