अहमदनगर: पावसाने उघडीप दिल्याने कपाशी रखडली

वाहताहेत केवळ जोरदार वारे, उगवण क्षमतेवर परिणामची चिन्हे
बागायती भागातही अल्पशी कपाशी लागवड
बियाणेउपलब्ध परंतु इतर पिकांचा पेराही रखडला

भाविनिमगाव – शेवगाव तालुक्‍यात मृग नक्षत्रात पावसाला सुरुवात झाली. पण त्यानंतर पावसानेउघडीप दिल्यानेबऱ्याच ठिकाणी कपाशी लागवड रखडली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तालुक्‍यात वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी रोहिणी व मृग नक्षत्राचा पाऊस झाला. परंतु पहिला पाऊस उष्णतेत जिरला. वादळी वाऱ्यासह अपवाद वगळता शेवगाव तालुक्‍यात कोठेच चांगला पाऊस झाला नाही. खरीप पिके लागवडीसाठी शेतकरी वर्गचांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. मृग नक्षत्रात सुरुवातीला चांगला पाऊस झाला तर कपाशीबरोबर इतर खरीप पिकेलागवड मोठ्या प्रमाणात होते.या काळातील पिकही जोमदार येते. परंतुयंदा अद्याप चांगला पाऊस झालेला नाही.

पहिल्या पावसानंतर सुटलेल्या जोरदार वाऱ्यांमुळे पाऊस लांबण्याची चिन्हे दिसत आहेत. यामुळ खरीप पेरणीही लांबणार आहे. शेती मशागतीची कामे जोरात सुरू आहेत परंतु पाऊस नाही.
बागायती परिसरात उपलब्ध पाण्यावर कपाशी लागवड सुरू आहे. पाऊस समाधानकारक नसल्याने शेतकरी ठराविक वाणालाच पसंती देत आहेत. बाजरी, मूग, कपाशी, तूर, सोयाबीन, मका आदी खरीप बियाणे पेरणीसाठी कृषी केंद्रात उपलब्ध झालेआहेत. परंतुपावसाअभावी शेतकरी बियाणेखरेदीच्या मनस्थितीत नाहीत.

सध्या तरी अतिशय अल्प क्षेत्रावर कपाशी लागवड होत आहे. कधी केवळ ढगाळ वातावरण तर कधी कडक उन्ह यामुळेकपाशी उगवण क्षमतेवर परिणाम होण्याचेसंकेत आहेत. चारा पिकाचीही लागवड रखडली आहे. दोनदिवसांपासून तालुक्‍यात बऱ्याच भागात अक्षरशः सोसाट्याचा वारा सुटत आहे. यामुळेकपाशी लागवड मात्र लांबवणीवर पडत आहे. मृग नक्षत्रात पिकाचा पेरा होईल की नाही या चिंतेत शेतकरी आहेत. शेतकरी जास्त पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.

धोंडा अन्‌नाही पिकाचा लोंढा…
धोंडा अन्‌ पिकाचा लोंढा या म्हणीप्रमाणेयंदा धोंड्याचा (अधिक मास) महिना होता. या महिन्यात पाऊसमान चांगलेहोऊन भरपूर धनधान्य पिकते, असा जुन्या जाणत्या लोकांचा अनुभव आहे. या धोंड्याला स्थिती नेमकी उलट दिसते. सुरुवातीला लांबलेला पाऊस कधी येणार व पेरा कधी होणार याची चिंता शेतकरी करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)