अहमदनगर: पालकांनी पाल्यांचा कल जाणावा

शेवगाव – “”पालकांनी आपले निर्णय आजच्या सजग पिढीवर लादण्यापूर्वी त्यांची आवड आणि कल लक्षात घ्यावा,” असे प्रतिपादन जिल्हा परिषद उपाध्यक्षा राजश्री घुले यांनी केले.
तालुक्‍यातील आव्हाणे बुद्रुक येथे आयोजित बालआनंद मेळाव्याचे उद्‌घाटन घुले यांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ साळवे, शिवाजी भुसारी, पंचायत समिती सदस्य कृष्णा पायघन, मंगेश थोरात, मनीषा कोळगे, अंबादास कळमकर, बबन भुसारी, गटविकास अधिकारी बंकट आर्ले, उपसरपंच सविता चोथे, डॉ. सुधाकर लांडे, शिक्षणविस्तार अधिकारी शैलजा राऊळ, शोभा नाईक, विनायक आहेर, रमेश लांडे यावेळी उपस्थित होते. बाजार समिती सभापती संजय कोळगे अध्यक्षस्थानी होते.
केंद्रप्रमुख रमेश गोरे, निवृत्ती गोरे, संगीता शिंदे, अरविंद खरमाटे, उषा भापसे, अशोक शिपलकर, सोपान पोटभरे, अनिल शेळके, मदन जाधव, दीपक भुकन, राम पठाडे, सोमनाथ मुरदारे, सचिन म्हस्के, मनोहर बैरागी, रघुनाथ लबडे, रामभाऊ गवळी यांनी कार्यक्रम आयोजनासाठी परिश्रम घेतले. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांनी केले. तर, सूत्रसंचालन राजू घुगरे यांनी केले. अनिल शेळके यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)