नगर – गेल्या अनेक दिवसांपासून भिंगारमध्ये पिण्याचे पाणी सुटलेले नाही. त्यामुळे येथील नागरिक पाण्यावाचून त्रस्त असून, विविध अडचणींना तोंड देत आहेत. नियमित पाणीपट्टी भरूनही पाणी सुटत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. वर्षातले 365 दिवसांपैकी फक्त 90 दिवसात पाणी भिंगार वासियांना दिले जाते तसेच टॅंकर चालकांकडून पैसे देऊन पाणी विकत घेतले जाते.

या संदर्भात भिंगारमधीले पाणीप्रश्‍नावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी भाजप मंडल अध्यक्ष शिवाजी दहीहंडे ,नगरसेविका शुभांगी साठे, गणेश साठे तसेच परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भिंगारचा पाणी प्रश्‍न कायमचा सुटावा, यासाठी भिंगार कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीवास्तव यांनी खासदार दिलीप गांधी यांच्यासमवेत वीज कंपनीचे अधिकारी, एमआयडीसीचे अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायमचा निकाली काढावा, अशी मागणी नागरिकांनी यावेळी केली होती परंतु प्रशासनाने याकडे कोणतेही लक्ष दिले नाही भिंगारचा पाणी प्रश्‍न जर सुटला नाही तर यापुढेही भिंगारमध्ये नागरिक पाणीपट्टी भरणार नाही असा इशारा शिवाजीराव दहीहंडे यांनी दिला भिंगार कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीवास्तव यांना दिला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)