अहमदनगर: पशुसंवर्धनासाठी जास्तीचा निधी आणणार

कोपरगाव – जिल्ह्यातील इतर तालुक्‍यांच्या तुलनेत कोपरगाव तालुका सरासरी दूध उत्पादनात मागे आहे. दूध उत्पादन वाढीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. पशुसंवर्धनासाठी जास्तीचा निधी आणणार आहे, असे आश्‍वासन जिल्हा परिषद सदस्या सोनाली रोहमारे यांनी दिले. तालुक्‍यातील धोंडेवाडी येथे पशुप्रदर्शन व संकरित वासरांचा खरेदी-विक्री मेळावा आयोजित करण्यात आला होता.

रोहमारे म्हणाल्या, “”मला पशुसंवर्धन समिती मिळाली याचा विशेष आनंद होतो. त्यामुळे जनावरांची सेवा करता येत आहे. ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांची माहिती व्हावी यासाठी पशुप्रदर्शन व संकरित वासरांचा मेळावा आयोजित केला आहे. पशुपालकांनी जनावरांना वेळोवेळी सरकारी दवाखान्याच्या माध्यमातून लसीकरण करून घ्यावे.” जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

रोहमारे यांच्या हस्ते पशुपालकांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, उत्तेजनार्थ बक्षिसे व औषधे वाटप करण्यात आले. डॉ. जामदार यांनी पशुपालकांना जनावरांची निवड कशी करावी, जनावरांची काळजी कशाप्रकारे घ्यावी, लसीकरण, आहार, रेबीज, जनावरांना होणारे विविध आजार, वंध्यत्व निवारण व औषधोपचार, चारा सकसीकरण, खत व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)