अहमदनगर: पक्‍क्‍या बांधकामांवर आजपासून हातोडा

संग्रहित फोटो

सीना नदीपात्रातील साडेचार किलोमीटरचे पात्र अतिक्रमणमुक्त

नगर – सीना नदीपात्रातील कच्ची अतिक्रमणे काढण्याची कारवाई गेल्या 17 दिवसांपासून सुरू होती. आता पक्के बांधकाम काढण्यास उद्या (ता. 14) पासून सुरुवात होणार आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने या वृत्ताला दुजोरा दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सीना नदीपात्रातील मातीच्या ढिगाऱ्यांसह पात्र रुंदीकरण, शेतीबांध, शेत जमीन, पिकं, हॉटेल, पक्‍क्‍या वीटभट्या आदींवर कारवाई करण्यात आली. सुमारे दहा हजारपेक्षा जास्त ब्रास मातीचे ढिगार हटविण्यात आले; परंतु नदीपात्रालगत असलेल्या पक्‍क्‍या बांधकामांवर कधी कारवाई करणार हा प्रश्‍न होता. नगर शहरातून गेलेली सीना नदीचे अस्तित्त्व कागदोपत्रीच होते. तिचे पात्र गटारासारखे झाले होते. अनेकांनी अतिक्रमणे करत नदीपात्र अरुंद केले होते. वीटभट्या, शेतजमीन, बांध घालून केलेली शेती, शहरातील इमारतींचे मलबे, शेतकऱ्यांनी केलेले अतिक्रमणे या सर्वांमुळे कधी सीना कोपली, की तिचे पाणी शहरात घुसत होते. नदीचे पात्र नगरकरांसाठी धोक्‍याचे ठरू लागले होते. तीन ते चार वर्षांपासून शहरात पडलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरादेखील होत नव्हता. काही वसाहतींतील घरांमध्ये सातत्याने पाणी घुसण्याच्या घटना घडू लागल्या होत्या. या अतिक्रमणांमुळे सीनेची पूर नियंत्रण रेषाच पुसून गेली होती.

सीनेतील अतिक्रमणांचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून चांगलाच गाजत होता. आमदार संग्राम जगताप यांनी सीनेतील अतिक्रमणांकडे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी त्याची दखल घेतली होती; परंतु प्रत्यक्षात कारवाईला मुहूर्त लागत नव्हता. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पदभार स्वीकारताच त्यांच्याकडे महापालिकेच्या आयुक्तपदाचादेखील प्रभारी पदभार आला. त्यांनी सीना नदीपात्रातील अतिक्रमणांवर कारवाई निश्‍चित केली. त्यानुसार गेल्या 17 दिवसांपासून द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी अतिक्रमणाविरोधात मोहीम उघडली आहे. नदीपात्रातील अतिक्रमण विरोधी मोहिमेला थोडासा विरोध झाला; परंतु तो मोडीत काढण्यात आला. नदीपात्रातील मातीचे ढिगारे हटवून पात्राचे रुंदीकरण झाले. पात्रालगत आणि पूररेषा ओलांडून झालेल्या पक्‍क्‍या अतिक्रमणांवर कारवाई कधी, याची उत्सुकता नगरकरांना होती. ती उत्सुकता नंदनवन लॉनच्या अतिक्रमणावर कारवाई करून वाढवली होती. नंदनवनच्या संचालकांनी न्यायालयात धाव घेतली. या प्रकारानंतर अतिक्रमण मोहीम थांबते, की काय अशी शंका घेतली जात होती; परंतु कारवाई सुरूच राहिली. वारुळाचा मारुती येथील पुलाच्यापुढे सध्या मोहीम सुरू आहे. तिथे नदीपात्रालगत नर्सरी आढळून आली आहे. पाचशे ते सातशे फूट लांब आणि दहा फूट रुंद आहे. ती आज काढण्यात आली. उद्या पक्‍कय बांधकामावर कारवाई सुरू होणार आहे. इथापे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)