अहमदनगर: नराधम परप्रांतीयाला सश्रम जन्मठेप

अशी आहे शिक्षा
सुशील रणजितसिंग जांगुला सश्रम जन्मठेप व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 1 वर्षे सश्रम कारावास, भादवि कलम 342 अन्वये 1 वर्षे सश्रम कारावास एक हजार दंड, दंड न भरल्यास 2 महिने कारावास, बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम 4 अन्वये 7 वर्षे सश्रम कारावास 3 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिने सश्रम कारावास, बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम 6 अन्वये 6 वर्षे सश्रम कारावास 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्षे सश्रम कारावास, बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम 8 अन्वये 4 वर्षे सश्रम कारावास 2 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 4 महिने सश्रम कारावास अशा शिक्षा न्यायाधीश एन. के. ब्रह्मे यांनी सुनावल्या आहेत सर्व शिक्षा एकावेळेस भोगायच्या आहेत.

चाकण येथे अल्पवयीन मुलींबरोबर लैंगिकचाळे प्रकरण : राजगुरूनगर सत्र न्यायालयाचा निर्णय

राजगुरूनगर – चाकण (ता. खेड) येथे 2015मध्ये तीन अल्पवयीन मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवून त्यांना बंद खोलीत डांबून त्यांच्यासोबत लैंगिक चाळे करणाऱ्या परप्रांतीय नराधमाला राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्‍त सत्र न्यायालयाचे न्यायाधीक्ष एन. के. बह्मे यांनी सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सुशील रणजितसिंग जांगु (वय 46, सध्या रा. झित्राईमळा, चाकण (ता. खेड), मुळगाव भांगवा, ता. भादरा, जिल्हा हनुमानगड, राजस्थान) असे शिक्षा झालेल्या नराधमाचे नाव आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेतील नराधमाला न्यायालयाने दिलेल्या सश्रम जन्मठेपेच्या शिक्षेबाबत तीन पीडित मुलींच्या पालकांनी समाधान व्यक्‍त केले.

या खटल्याची माहिती अशी कि, चाकण येथील झित्राईमळा येथे सुशील रणजितसिंग जांगु हा राहत होता. दि.10 फेब्रवारी 2015 रोजी दुपारी नराधमाने त्याच्या खोली समोर खेळणाऱ्या सात, सहा व पाच वर्षांच्या तीन निरागस मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवून त्याच्या खोलीत बोलावले. मुली खोलीत आल्यावर दरवाजा बंद करून लहान मुलींसमवेत अश्‍लील चाळे केले तर एका मुलीवर त्याने अत्याचार केला. त्यानंतर मुलीना खोलीत डांबून ठेवले.
पीडित मुलींची सुटका होताच त्यांनी झालेला प्रकार त्यांच्या आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी चाकण पोलिसांत फिर्याद दिली होती, त्यानुसार चाकण पोलिसांनी सुशील जांगु विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली होती. हा खटला राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्‍त सत्र न्यायलयात न्यायाधीश ब्रह्मे यांच्या पुढे सुरू होता. सरकारी पक्षाच्यावतीने ऍड. गिरीश कोबल यांनी 8 साक्षीदार तपासले. त्यामध्ये तिन्ही पीडित मुली, फिर्यादी व डॉक्‍टर यांची साक्ष न्यायालयाने ग्राह्य धरून नराधम सुशीलला दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)