अहमदनगर: डीजेप्रकरणी मंडलाधिकाऱ्यांच्या मुलावर गुन्हा

श्रीगोंदा – शहरातील वडाळी रस्त्यावरील दूरसंचारच्या कार्यालयाजवळ डीजेचा दणदणाट सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात मंडलाधिकाऱ्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त डीजे लावल्याचे आढळून आले. या प्रकरणी मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली असता महसूलमधील एका मंडलाधिकाऱ्याच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त डीजे लावल्याचे आढळले. डीजेचालक परशुराम शहाजी भापकर (रा. हंगेवाडी) याला त्याच्या डिजेचा आवाज कमी करण्यास पोलिसांनी सांगितले. परंतु, डीजे मालकाने याकडे दुर्लक्ष करत डीजेचा दणदणाट सुरूच ठेवला. त्यामुळे पोलिसांनी डीजे मालक भापकर याला त्याच्या ओम डिजिटल या डिजेसह श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आणून त्याच्यावर ध्वनीनियंत्रण प्रदूषण कायद्यानुसार व सार्वजनिक शांततेचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करून अटक केली. तसेच, या डीजे मालकाला पोलिसांनी चांगलाच पोलिसी खाक्‍यादेखील दाखवला. ज्या मंडल अधिकाऱ्याच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त हा डीजे लावण्यात आला होता त्या अल्पवयीन मुलावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, भापकर यांची डीजेची गाडी पोलिसांनी जप्त केली.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)