अहमदनगर: जीएसटीचे 1436 कोटींचे अनुदान महापालिकांकडे वर्ग

मुंबईला सर्वाधिक, तर लातूरला सर्वांत कमी निधी; नगरला सात कोटी

नगर -वस्तू व सेवाकराच्या पोटी महापालिकांना मिळणारा निधी राज्य सरकारने महापालिकांकडे वर्ग करण्यास मान्यता दिली आहे. मुंबई महापालिकेला अपेक्षेप्रमाणे सर्वांधिक 699 कोटी रुपयांचे अनुदान वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली आहे, तर लातूरला सर्वांत कमी म्हणजे एक कोटी 12 लाख रुपयांचे जीएसटी अनुदान मिळाले आहे. नगरला सहा कोटी 84 लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या वर्षी एक जुलैपासून देशात वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे महापालिकांचे उत्पन्नाचे साधन हिरावले गेले. पूर्वी महापालिकांना व्हॅटच्या रुपाने उत्पन्न मिळत होते; मात्र जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे महापालिकांचा उत्पन्नाचा स्त्रोत बंद झाला. त्याऐवजी केंद्र सरकार महापालिकांना अनुदान देते. प्रवेश कर, उपकर, सेवाकर आदी कर बंद झाले. आता केंद्र सरकारने राज्यातील महापालिकांना त्यांच्या त्यांच्या उत्पन्नाच्या प्रमाणात भरपाई द्यायला सुरुवात केली आहे. त्याचा दुसरा हप्ता आता महापालिकांकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यानुसार महापालिकांच्या खाती आता अनुदान जमा झाले आहे.

राज्य सरकारने महापालिकांना वितरीत केलेली रक्कम (कोटीत)-नागपूर (52 कोटी 57 लाख), चंद्रपूर (चार कोटी 87 लाख), अमरावती (नऊ कोटी 87 लाख), अकोला (पाच कोटी 36लाख), औरंगाबाद (21 कोटी 12 लाख), परभणी (एक कोटी 12 लाख), लातूर (एक कोटी 12 लाख), नांदेड वाघाळा (सहा कोटी दहा लाख), नाशिक (72 कोटी 83 लाख), मालेगाव (12 कोटी तीन लाख), धुळे (सात कोटी 66लाख), जळगाव (नऊ कोटी 22लाख), नगर (सहा कोटी 84लाख), पुणे (131कोटी सहा लाख), पिंपरी चिंचवड (125 कोटी 57लाख), कोल्हापूर (दहा कोटी 52लाख), सोलापूर (15 कोटी 38 लाख), सांगली (11कोटी 68 लाख), मीरा भाईंदर (13 कोटी 81 लाख), वसई विरार (25 कोटी दहा लाख), भिवंडी निजामपूर (19कोटी 39 लाख), उल्हासनगर (13 कोटी 93 लाख), कल्याण डोंबिवली (14 कोटी 18 लाख), ठाणे (साठ कोटी ), नवी मुंबई (85 कोटी 83 लाख) बृहन्मुंबई (699कोटी 13 लाख रुपये)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)