अहमदनगर जिल्ह्यात 50 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

ग्रीन आर्मीचे 1 लाख 76 हजार सदस्य
जिल्ह्यात हरितसेना उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे उपवनसंरक्षक रेड्डी यांनी सांगितले. पर्यावरणप्रेमींना हरित सेनेचे सदस्य होऊन या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 1 लाख 76 हजार हरितसेनेचे ऑनलाइन सदस्य झाले आहेत. 49 लाख 40 हजार वृक्ष लागवडीसाठी स्थळनिश्‍चिती करण्यात आली आहे. 99 टक्‍के स्थळनिश्‍चितीचे काम पूर्ण झाले असून, 31 मार्च 2018 पर्यंत उर्वरित खड्डे खोदण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचेही रेड्डी यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी अभय महाजन : वृक्षलागवड मोहिमेत यंत्रणेसोबतच लोकसहभाग आवश्‍यक

नगर – 50 कोटी वृक्षलागवड मोहिमेंतर्गत यावर्षी राज्यात 13 कोटी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या अंतर्गत जिल्ह्याला 49 लाख 93 हजार 510 वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

जिल्ह्यात वृक्षलागवड मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी त्यांना देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिल्या. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने, उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, उपजिल्हाधिकारी वामन कदम, सेवानिवृत्त साहाय्यक वनसंरक्षक अरुण येलजाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावर्षी जिल्ह्याला 49 लाख 93 हजार 510 वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना 14 लाख 30 हजार, वनविभागास 30 लाख 20 हजार, इतर यंत्रणेमार्फत 5 लाख 43 हजार 510 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यात 59 लाख 40 हजारपेक्षा अधिक रोपे तयार असल्याची माहिती रेड्डी यांनी बैठकीत दिली. यामध्ये कडूलिंब, सिसम, करंज, आवळा, चिंच, वड यासह आठ ते दहा प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी नियोजन करावे. वृक्ष लागवडीसाठी लागणारे खड्डे मार्चअखेर पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी महाजन यांनी झालेल्या बैठकीत दिल्या. त्याचबरोबर जिल्ह्यात हरित सेनेची सभासद नोंदणी वाढण्यासाठी सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी नोंदणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

2016 मध्ये 15 लाख 48 हजार, 2017 मध्ये 28 लाख 58 हजार व 2018 मध्ये 49 लाख 93 हजार एवढे वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. 2016 व 2017 मध्ये उद्दिष्टापेक्षाही जिल्ह्याने जास्त वृक्ष लागवडीचे काम केले आहे. वृक्षलागवड मोहिमेत यंत्रणेसोबतच लोकसहभाग आवश्‍यक असून प्रत्येक कुटुंबाने वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्‍यात असलेल्या रानमळा गावाने वृक्ष लागवडीचे कौतुकास्पद काम केले आहे. जिल्ह्यातही याच गावाच्या धर्तीवर वृक्षलागवड करण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)