अहमदनगर: जिल्ह्यातून 50 डुकरांचे रक्त नमुने घेणार

खाण्याचा सोडा, चुना फवारणी
ज्या ठिकाणी वटवाघळांची वस्ती आहे, अशा झाडांखाली खाण्याचा सोडा आणि चुन्याच्या भुकटीची फवारणी करण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत. वटवाघळांच्या विष्ठेतून या रोगाचा प्रसार होत असल्याने याबाबत दक्षता घेण्यास सांगण्यात आले असून, या फवारणीतून प्रसाराला प्रतिबंध होणार आहे.

शासनाच्या आदेशानंतर पशुसंवर्धन विभाग सज्ज
“निपाह’च्या पार्श्वभूमीवर तालुक्‍यानिहाय पथक, वटवाघळांची ठिकाणी शोधणार

नगर- केरळमध्ये फैलावलेल्या “निपाह’आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून 50 डुकरांच्या रक्तांचे नमुने घेण्याचे आदेश पशुसंवर्धन विभागाने अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात रक्‍त नमुने घेण्यासाठी तालुकानिहाय पथक तयार करण्यात आले असून येत्या दोन दिवसात 50 डुकरांचे रक्‍त नमुने पुण्याला विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे यांनी दिली.

केरळमध्ये “निपाह’च्या विषाणूंची लागण झाल्याने काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या रोगावर लस, उपचार उपलब्ध नसल्याने याचे गांभीर्य वाढले असून, त्या दृष्टीने महाराष्ट्र शासनानेही पावले उचलली आहेत.डुकरे आणि वटवाघळांच्या माध्यमातून या रोगाचे विषाणू पसरत असल्याने या दोन घटकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यानुसार राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त कांतिलाल उमाप यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातून 50 डुकरांचे रक्तनमुने घेऊन ते पुण्याला चाचणीसाठी पाठवायचे आहेत. तसेच वटवाघळांच्या वस्तीवरही लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. “मास्क’ घालून रक्त नमुने घ्या, डुकरांचे रक्त नमुने घेतानाही एनक्‍यू 5′ हे विशिष्ट प्रकारचे मास्क वापरूनच रक्त नमुने घेण्यास पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यात 2012 मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार 13 हजार 800 डुकरांची संख्या आहे. परंतु शासनाने पुन्हा डुकरांचा सर्व्हे करण्याचे आदेश दिले आहे. रक्‍तनमुन्याबरोबरच हा सर्व्हे करण्यात येणार आहे. त्यासाठी तालुकानिहाय पथक तयार करण्यात आले आहे. 1 पशुधनविकास अधिकारी, 2 पशुधन पर्यवेक्षक, दोन शिपाई असे पाच जणांचा समावेश या पथकात राहणार आहे. येत्या दोन दिवसात डुकरांचे रक्‍त नमुने घेवून ते प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. असे डॉ. तुंबारे यांनी सांगितले. डुकरांबरोबरच वटवाघळांच्या ठिकाणांचा शोध घेण्यात येणार आहे. त्यासाठी गावागावी हे पथक माहिती घेणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)