नगर – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी 2018 मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत जिल्ह्याचा निकाल 89.25 टक्के लागला असून, पुणे विभागात नगर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. नगर जिल्ह्यात सर्व तालुक्‍यांमध्ये मुलींनी बाजी मारली. जिल्ह्यातून एकूण 36 हजार 151 मुले, 25 हजार 990 मुली असे 62 हजार 141 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 30 हजार 996 मुले व 24 हजार 495 मुली असे एकूण 55 हजार 461 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने जिल्ह्याचा निकाल 89.25 असा लागला.

उत्तीर्णांमध्ये मुलांचे प्रमाण 85.66 टक्के, तर मुलींचे प्रमाण 94.25 टक्के एवढे आहे. जिल्ह्यात राहुरी तालुक्‍याचा निकाल 92.19 टक्के लागला. जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल 97.29, कला शाखेचा निकाल 75.76, वाणिज्य शाखेचा निकाल 92.7 आणि व्यावसायिक विषय शिक्षणाचा निकाल 81.66 असा एकूण निकाल 89.25 लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)