अहमदनगर: जलयुक्‍तने अनेक गावांचा पाणी प्रश्‍न मिटविला

आमदार मोनिका राजळे : हातगाव येथे 39 लाख रुपये खर्चाच्या बंधाऱ्याचे भूमिपूजन

शेवगाव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सतत जनतेच्या हिताचे महत्त्वाकांक्षी निर्णय घेतले. मुद्रा लोन, उज्ज्वला गॅससारख्या जनतेच्या जिव्हाळ्याच्या योजनाही चांगल्या पद्धतीने राबविल्या. जलयुक्‍त योजना प्रभावीपणे राबवल्याने अनेक गावांचा पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न निकाली निघाला. शेवगाव-पाथर्डीत आमदारकीच्या काळात 150 मोठ-मोठे बंधारे तयार करण्यात आले. तसेच बोंडअळीचा जिल्ह्यासाठी जो निधी आला, त्यामध्ये सर्वात जास्त निधी शेवगाव तालुक्‍यासाठी मिळाल्याचे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.

शेवगाव तालुक्‍यातील हातगाव येथे जलयुक्‍त शिवार योजनेंतर्गत 39 लाख रुपये खर्चाच्या बंधारा कामाचे भूमिपूजन, पुनर्वसन विभागाकडून मंजूर लक्ष्मी चांदगाव (पुनर्वसन) येथील 10 लाख 45 हजार रुपयांच्या सभामंडपाचे भूमिपूजन, राज्य शासनाच्या 25 : 15 या ग्रामविकास फंडातून श्रीराम मंदिर ते पैठण-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील हातगाव-मुंगी रस्त्यापर्यंतच्या रस्त्यांच्या 33 लाख रुपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन, अशा एकूण 83 लाख रुपये खर्चाच्या कामांचे भूमिपूजन झाले. त्यावेळी आ. राजळे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड होते.
प्रा. बेरड म्हणाले की, राज्यात व देशात अनेक वर्ष कॉंग्रेसने सत्ता भोगली, मात्र त्यांचे निर्णय कार्यकर्त्यांच्या हिताचे होते. भाजपचे सर्व निर्णय तळागाळातील जनतेच्या हिताचे असल्याचे सांगून प्रसार माध्यम जरी शासनाच्या विरोधात असले तरी ज्या-ज्या ठिकाणी निवडणुका होत आहेत. त्या सर्व ठिकाणी भाजपलाच जनतेचा कौल मिळत आहे.

भाजपचे तालुकाप्रमुख बापूसाहेब पाटेकर, बंडू रासने यांनीही मनोगत व्यक्‍त केले. भाजप डॉक्‍टर सेलचे तालुकाप्रमुख डॉ. निलेश मंत्री यांनी प्रास्तविकात 4 वर्षात आ. राजळेंकडून गावासाठी मिळालेल्या भरीव निधीबाबत माहिती दिली. कार्यक्रमास भाजपचे जिल्हा कोषाध्यक्ष ऍड. विवेक नाईक, ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, शेवगावचे नगरसेवक अशोक अहुजा, पक्षाचे युवा तालुकाप्रमुख नितीन फुंदे, राम केसभट, बबन घोरतळे, संजय खेडकर, पांडुरंग तहकिक, सुरेश नेमाणे, सुरेश थोरात, रज्जाक बेग, अशोक गायकवाड, प्रशांत ढाकणे, शरद चाबुकस्वार, रजनीकांत कटारिया, सुनील राजपुत, रोहन लांडे, नारायण मडके, मयूर वैद्य, विजय नजन, दिलीप विखे, सरपंच बेबीताई भराट, उपसरपंच विठ्ठल अभंग, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी जालिंदर कोठुळे, कृषीचे प्रभारी मंडळ अधिकारी अशोक बटुळे, कृषी सहाय्यक गणेश पवार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन निलेश ढाकणे यांनी केले तर आभार प्रा. भाऊसाहेब मुरकुटे यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)