अहमदनगर: चाकुचा धाक दाखवून रोकड लुटली

राहूरी- ऍक्‍टिवा मोपेडवर चाललेल्या दोघा तरूणांना जबर मारहाण करत धारदार चाकूचा धाक दाखवुन त्यांच्या जवळील 30 हजार रूपयांची रोकड लुटल्याने खळबळ उडाली आहे.

आठवडे भरापुर्वी राहुरी शिंगणापुर फाट्याजवळ दरोडेखोरांची टोळी पकडण्यात आलेली आहे. या पाठोपाठ फाट्यापासुन हाकेच्या अंतरावर आज रस्तालुटीची घटना घडल्याने नगर मनमाड राज्य मार्गावरील राहुरी हद्दीत गुन्हेगारीने डोके वर काढल्याचे स्पष्ट झाले आहे. रस्तालुटीचे केंद्रबिंदु म्हणुन ओळख असलेल्या नगर मनमाड राज्य मार्गावरील डिग्रस फाट्याजवळ मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली.निंबळक ता.राहुरी येथील विजय खपके व संतोष काळे हे ऍक्‍टिव्हा क्रमांक एम.एच.16 बी.एफ 969 या मोपेडवर नगर कडुन राहुरी दिशेला जात होते. खपके आपल्या मित्रा समवेत कृषी विद्यापिठाच्या पुढे डिग्रस फाट्याजवळ आल्यानंतर पाठीमागच्या बाजुने पल्सर वरील दोघा भामट्यांनी मोटरसायकल आडवी घालुन खपके यांना थांबण्यास भाग पाडले.
तोंडाला रूमाल बांधलेल्या दोघांनी खटके व काळे या दोघांना बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी बचावासाठी खपके यांच्याकडुन प्रतिकार करण्याचा प्रयत्न झाला असता धारदार चाकुचा धाक दाखवुन खपके यांच्या खिशातील 30 हजार रूपयांची रोकड तसेच ऍक्‍टिव्हा मोपेडची चावी हिसकावुन दोघे भामटे धूम स्टाईलने राहुरी दिशेला पळुन गेले. रात्रीची वेळ असल्याने लुटमार झालेल्या ठिकाणी कुणीही मदतीला आले नाही.

विजय खपके यांनी राहुरी पोलीसात धाव घेऊन घटनेची माहिती दिली. आज दुपारी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, उपनिरीक्षक लक्ष्मण भोसले, पोलीस कॉन्सटेबल अरूण वाघमोडे यांनी घटनास्थळी जावुन पाहणी केली. नगर – मनमाड राज्य मार्गावरील राहुरी खुर्द, राहुरी शिंगणापुर फाटा,धर्माडी विश्रामगृह,डिग्रस फाटा,मुळा उजवा कालवा, राहुरी फॅक्‍टरी, गुहा, चिंचोली ही रस्तालुटीची प्रमुख ठिकाणे बनली आहेत. तीन महिन्यापुर्वी डिग्रस फाट्यावर वळण येथील कापुस व्यापा-याला लाखो रूपयास लुटल्याची घटना घडली आहे.तर आठवडे भरापुर्वी राहुरी शिंगणापुर फाट्यावर दरोड्याच्या तयारीत असलेली प्रदीप सरोदे या अट्टल गुन्हेगाराची टोळी गुन्हा अन्वेषण विभागाने जेरबंद केली.

राहूरीचे पोलीस निरिक्षक प्रमोद वाघ यांनी या रस्तालुटीतील टोळ्यांचा बिमोड करण्यासाठी रात्रीची गस्त वाढवून विविध गुन्हेगार जेरबंद केले आहेत.मध्यंतरी या घटनांना आळा बसविण्यात त्यांना यश आले होते. मात्र आता परत या टोळ्या सक्रिय झाल्याचे चित्र आहे धर्माडी विश्रामगृहाचा परिसर व गुन्हेगारांचे कायम वास्तव्य हे समिकरण झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)